Indian Army TES Bharti 2026: भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी आहे. भारतीय सैन्याच्या 10+2 Technical Entry Scheme (TES) Course 57 – July 2027 साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे एकूण 90 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना भारतीय सैन्यात Permanent Commission मिळविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यांची माहिती खाली दिली आहे.
Indian Army TES Bharti 2026
एकूण जागा : 90
पदाचे नाव : 10+2 Technical Entry Scheme Course 57
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
- 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- Physics, Chemistry आणि Mathematics (PCM) या विषयांसह किमान 60% गुण आवश्यक.
- JEE (Mains) 2026 परीक्षेला उपस्थित असणे आवश्यक.
- अधिकृत जाहिरातीतील इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक.
वयोमर्यादा | Age Limit :
- उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011 या कालावधीत झालेला असावा.
-
1 जुलै 2027 रोजी उमेदवाराचे वय 16½ वर्षांपेक्षा कमी आणि 19½ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
प्रशिक्षणाचा कालावधी | Indian Army TES Training 2027 :
TES-57 प्रवेश योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना एकूण चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.
- पहिली तीन वर्षे: संबंधित Cadets Training Wing येथे प्रशिक्षण.
- चौथे वर्ष: Indian Military Academy (IMA), देहरादून येथे प्रशिक्षण.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर: अभियांत्रिकी पदवी.
प्रशिक्षणासाठी उपलब्ध पर्याय:
- CTW, CME – पुणे
- CTW, MCTE – महू
- CTW, MCEME – सिकंदराबाद
प्रशिक्षण केंद्राचे अंतिम वाटप भारतीय सैन्याच्या निर्णयानुसार केले जाईल.
पगार | Salary :
- अधिकृत अधिसूचनेनुसार, प्रशिक्षणाची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर IMA मधील प्रशिक्षणाच्या टप्प्यात पात्र कॅडेट्सना दरमहा ₹56,100 स्टायपेंड दिला जाईल.
- चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना लेफ्टनंट पदावर Permanent Commission दिले जाईल.
लेफ्टनंट पदाचे वेतन:
- वेतन स्तर: Pay Level 10
- वेतनश्रेणी: ₹56,100 ते ₹1,77,500
- इतर भत्ते: लागू नियमांनुसार
प्रत्यक्ष वेतन आणि भत्ते लागू सेवा नियमांनुसार निश्चित केले जातील.
निवड प्रक्रिया | Selection Process :
या भरतीसाठी निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांनुसार होईल.
- ऑनलाइन अर्जांची छाननी.
- JEE Main 2026 Common Rank List (CRL) च्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग.
- SSB मुलाखत.
- वैद्यकीय तपासणी.
- गुणवत्ता यादी (Merit List).
- जॉइनिंग लेटर आणि प्रशिक्षणासाठी निवड.
SSB मुलाखतीसाठी आवश्यक कट-ऑफ भारतीय सैन्य निश्चित करेल. केवळ SSB मुलाखत उत्तीर्ण झाल्याने अंतिम निवड निश्चित होत नाही.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू | 14 ऑक्टोबर 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 नोव्हेंबर 2026 |
| कट-ऑफ जाहीर होण्याची संभाव्य तारीख | नोव्हेंबर 2026 चा तिसरा आठवडा |
| SSB मुलाखतीचा संभाव्य कालावधी | फेब्रुवारी ते मार्च 2027 |
| कोर्स सुरू होण्याची वेळ | जुलै 2027 |
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा