GMC Akola Group D Bharti 2026 मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधीनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील गट-ड (वर्ग-४) समकक्ष व इतर संवर्गातील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७/११/२०२६ रोजी दुपारी ४:०० वाजल्यापासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८/१२/२०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत आहे.
किमान १०वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती असून निवड ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेद्वारे होणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीतील सर्व अटी, आरक्षण व मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
GMC Akola Group D Bharti 2026
एकूण जागा : 101
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
| अ.क्र. | पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
| १ |
शिपाई |
०५ |
| २ |
प्रयोगशाळा परिचर |
१४ |
२. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला
| अ.क्र. | पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
| १ |
कक्षसेवक |
४७ |
| २ |
अपघात विभाग सेवक |
०६ |
| ३ |
बाह्यरुग्ण सेवक |
०४ |
| ४ |
शिपाई |
०८ |
| ५ |
पहारेकरी |
०४ |
| ६ |
प्रयोगशाळा परिचर |
०२ |
| ७ |
क्ष-किरण परिचर |
०२ |
| ८ |
आया |
०३ |
| ९ |
रक्तपेढी परिचर |
०२ |
| १० |
सहाय्यक स्वयंपाकी |
०४ |
शैक्षणिक पात्रता | Educational Qualification
सर्व गट-ड (वर्ग-४) समकक्ष पदे व इतर संवर्ग
-
उमेदवार भारतीय नागरिक असावा.
-
जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास (०६/११/२०२६) उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालान्त परीक्षा (१०वी उत्तीर्ण) पूर्णतः धारण केलेली असावी.
-
उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
माजी सैनिकांसाठी शैक्षणिक अर्हता
-
तांत्रिक किंवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक नसलेल्या पदांसाठी १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एसएससी (SSC) उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा | Age Limit
वयोमर्यादा मोजण्याचा दिनांक १७.११.२०२६ निश्चित करण्यात आला आहे.
| प्रवर्ग / घटक | वयोमर्यादा / सवलतीची अट |
| खुला प्रवर्ग |
किमान १८ वर्षे; कमाल ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. |
| मागावर्गीय प्रवर्ग |
किमान १८ वर्षे; कमाल ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे (क्रिमीलेअरमध्ये मोडणाऱ्या विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना वयाची सवलत लागू नाही). |
| अंशकालीन पदवीधर उमेदवार |
कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे. |
| स्वतंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, १९९१ जनगणना कर्मचारी व १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी |
कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे (या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांनाही कमाल ४५ वर्षे). |
| खेळाडू उमेदवार |
नियमानुसार ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल; उच्चतम वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत. |
| दिव्यांग उमेदवार |
उच्चतम वयोमर्यादा सरसकट ४५ वर्षे (किमान ४०% दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक). |
| भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त उमेदवार |
कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे (मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांनाही ४५ वर्षे). |
| माजी सैनिक |
सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे (दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल ४५ वर्षे). |
परीक्षा शुल्क | Application Fee
| प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
| खुला प्रवर्ग |
रु. १०००/- (अक्षरी रु. एक हजार मात्र) |
| राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) |
रु. ९००/- (अक्षरी रु. नऊशे मात्र) |
| माजी सैनिक |
शुल्क आकारले जाणार नाही |
-
परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) असून ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे (UPI, Credit Card, Debit Card, Net Banking) १८/१२/२०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत भरता येईल.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates
| Event | Date |
| जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा दिनांक |
०६/११/२०२६ |
| Application Start |
१७/११/२०२६ (दुपारी १६.०० वाजल्यापासून) |
| Last Date (अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख) |
१८/१२/२०२६ (दुपारी १६.०० वाजेपर्यंत) |
| परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख |
१८/१२/२०२६ (रात्री २३.५९ वाजेपर्यंत) |
| Exam/Test Date |
|
| प्रवेश प्रमाणपत्र उपलब्धता |
परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे १० दिवस अगोदर प्रोफाईलद्वारे |
महत्वाच्या लिंक (Important Links) :
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा