MSF Bharti List 2024-25: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (MSSC) पुरुष सुरक्षा रक्षक (कंत्राटी) पदाच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-2025 मधील लेखी व मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या प्रतीक्षायादीतील उमेदवारांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे.
महामंडळाने डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत.
नोंदणी प्रक्रियेचा तपशील
- महामंडळ: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC)
- पदाचे नाव: पुरुष सुरक्षा रक्षक (कंत्राटी)
- भरती संदर्भ: पोलीस भरती 2024-2025 प्रतीक्षायादीतील उमेदवार
- यादीतील उमेदवार: 13,259
- नोंदणी कालावधी: 1 ते 5 डिसेंबर 2026
- नोंदणीचे ठिकाण: प्रेरणा हॉल, आझाद मैदान पोलीस क्लबजवळ, मुंबई.
आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांनी दहावी व बारावीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, वाहन परवाना (असल्यास), शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पोलीस भरती अर्जाची प्रत तसेच हॉलतिकीट सोबत आणावे.
महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांनी PDF मध्ये दिलेल्या वेळेनुसारच उपस्थित राहावे. प्रवास, भोजन व निवासाची व्यवस्था उमेदवारांनी स्वतः करायची आहे. महामंडळाकडून निवासाची व्यवस्था केली जाणार नाही.
प्रशिक्षणाचा कालावधी 45 दिवसांचा असून प्रशिक्षणासाठी 20,000 रुपये शुल्क नमूद केले आहे. त्यापैकी 15,000 रुपये नॉन-रिफंडेबल आणि 5,000 रुपये रिफंडेबल आहेत.
अधिकृत सूचना PDF
उमेदवारांनी नोंदणीपूर्वी महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या संपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.