Maharashtra Police Bharti 2022 New Update

Maharashtra Police Bharti 2022 New Update: ७२३१ पदांच्या पोलीस भरतीला मान्यता, लवकरच सुरु होणार पोलीस भरती

Maharashtra Police Bharti 2022 New Update: महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता 2020 आणि 2021 मधील तब्बल १९,७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल. काल, 21 सप्टेंबर 2022 रोजी CMO महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर प्रकाशित माहितीनुसार सध्या 7231 पदाच्या पोलीसभरतील मान्यता मिळाली आहे. तसेच या भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तेव्हा लवकरच जाहिरात प्रकाशित होणे अपेक्षित आहे.


Maharashtra Police Bharti 2022 New Update

राज्यात 75 हजार पोलीसांची भरती करण्याबाबत राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करत पारदर्शीपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Maharashtra Police Bharti 2022 New Update

राज्यामध्ये घोषणा करण्यात आलेल्या एकूण पदांपैकी सध्या 7231 पदांना मान्यता देण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, भरतीवेळी लेखी परीक्षेपूर्वी अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबईमधील 20 मैदानांवर संपूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा.

 हे पण वाचा – मैदानी चाचणी प्रथमच होणार शासन निर्णय जाहीर; वाचा सविस्तर – येथे क्लिक करा 




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top