Maharashtra Police Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मैदानी चाचणी प्रथमच होणार शासन निर्णय जाहीर – GR वाचा सविस्तर
पोलीस भरती 2022 मैदानी चाचणी :-
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लवकरच सुरु होणार आहे आणि पोलीस भरती 2022 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला एक प्रश्न भेडसावत होता तो म्हणजे प्रथम शारीरिक चाचणी (Physical Test) होणार, की लेखी चाचणी होणार आहे? या शासन निर्णयाने ह्या प्रश्नाला उत्तर मिळाले आहेत.
दिनांक 24 जून 2022 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र जाहीर केले आहे आणि त्या मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2022 बाबत भरती प्रक्रिया राबने बाबत राजपत्र काढले आहे. त्यामध्ये खालील चार्ट मध्ये दर्शवल्या प्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये शारीरिक चाचणी ही सुरुवातीला होणार आहे आणि त्या मध्ये मुख्यतः 03 Event राहणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 पुरुष मैदानी चाचणी गुण:-
Event | गुण | |
1 | १६०० मीटर धावणे | 20 |
2 | १०० मीटर धावणे | 15 |
3 | गोळाफेक | 15 |
एकुण | 50 |
वरील प्रमाणे maha police bharti 2022 psysical test घेण्यात येईल.आता उमेदवाराने वरील प्रमाणेच मैदानी चाचणी सुरू करावी आणि जास्तीत जास्त लेखी परीक्षेच्या तयारीला द्यावा.
पोलीस भरती 2022 महिला मैदानी चाचणी :-
Event | गुण | |
1 | ८०० मीटर धावणे | 20 |
2 | १०० मीटर धावणे | 15 |
3 | गोळाफेक | 15 |
एकुण | 50 |
पोलीस भरती 2022 लेखी चाचणी (१०० गुण) Police Bharti 2022 Written test Mark:–
महाराष्ट्र शासन राजपत्र द्वारे शासन निर्णय प्रकाशित झाला आहे त्यानुसार पोलीस भरती 2022 मैदानी चाचणी मध्ये (शारीरिक योग्यता चाचणी) किमान ५०% गुण मिळवणारे उमेदवारचं हे संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता पात्र राहतील.
म्हणजे मैदानी चाचणी मध्ये 50% गुण मिळवणे अनिवार्य राहील आणि तेच उमेदवार हे पोलीस भरती 2022 लेखी परीक्षा पात्र राहतील. यापैकी एकूण जागेच्या 1 उमेदवार मागे 10 उमेदवार लेखी परीक्षेत पात्र राहतील.
लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील Police Bharti 2022 syllabus:-
(Mahapolice Bharti 2022 syllabus and pattern) पोलीस भरती 2022 लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय राहील त्या मध्ये काही बदल करण्यात आला आहे का? तर नाही पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षा अभ्यासक्रम हा पूर्वी प्रमाणेच आहे. या पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेत पुढील विषयावर बहुपर्यायी प्रश्न राहतील.
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण.
वरील घटकावर 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्न राहतील आणि 90 मिनिटे वेळ राहील. नंतर मैदानी चाचणी 50 गुण + लेखी चाचणी 100 गुण असे एकूण 150 गुण पैकीं मेरिट नुसार अंतिम निवड यादी लागेल. पोलीस भरती 2022 जाहिरात मधील आरक्षण निहाय जागेची मेरिट लिस्ट लावण्यात येईल.
पोलीस भरती 2022 वैद्यकीय चाचणी police bharti 2022 Medical Test:-
मित्रांनो आता वरील मैदानी चाचणी व लेखी चाचणी माध्यमातून अंतिम निवड यादी मध्ये निवड झालेल्या उमेदवार यांचे वैद्यकीय चाचणी तपासणी होईल आणि नंतर पोलीस शिपाई पदावर हजर होणे चा आदेश मिळेल.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here