Sainik School Admission 2027: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE 2027) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे देशातील सैनिक स्कूल आणि नवीन सैनिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 6 वी आणि इयत्ता 9 वीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहितीपत्रक वाचून पात्रता, परीक्षा पद्धती आणि महत्त्वाच्या तारखा तपासून घ्याव्यात.
या लेखामध्ये AISSEE 2027 प्रवेश परीक्षा, ऑनलाइन अर्ज, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत वेबसाइटची माहिती दिली आहे.
Sainik School Admission 2027
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी पात्रता व वयोमर्यादा
इयत्ता 6 वी प्रवेशासाठी वयोमर्यादा
-
विद्यार्थ्याचे वय 31 मार्च 2027 रोजी 10 ते 12 वर्षे असावे.
-
विद्यार्थ्याचा जन्म 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2017 या कालावधीत झालेला असावा.
-
मुलगे आणि मुली दोघांनाही अर्ज करता येईल.
इयत्ता 9 वी प्रवेशासाठी वयोमर्यादा
-
विद्यार्थ्याचे वय 31 मार्च 2027 रोजी 13 ते 15 वर्षे असावे.
-
विद्यार्थ्याचा जन्म 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या कालावधीत झालेला असावा.
-
मुलगे आणि मुली दोघांनाही अर्ज करता येईल.
टीप: नवीन सैनिक स्कूलमधील प्रवेशासाठी संबंधित शाळेच्या प्रवेश धोरणानुसार पात्रता तपासणे आवश्यक आहे.
AISSEE 2027 परीक्षा पद्धती व गुण
AISSEE 2027 परीक्षा ऑफलाइन पद्धतीने OMR उत्तरपत्रिकेवर घेतली जाणार आहे. परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारले जातील.
इयत्ता 6 वी परीक्षा पद्धती
| विषय | प्रश्न संख्या | एकूण गुण |
|---|---|---|
| भाषा | 25 | 50 |
| गणित | 50 | 150 |
| बुद्धिमत्ता | 25 | 50 |
| सामान्य ज्ञान | 25 | 50 |
| एकूण | 125 | 300 |
-
परीक्षेचा कालावधी: 150 मिनिटे
-
परीक्षा वेळ: दुपारी 2 ते 4:30
-
प्रश्नपत्रिका: 13 भाषांमध्ये उपलब्ध
इयत्ता 9 वी परीक्षा पद्धती
| विषय | प्रश्न संख्या | एकूण गुण |
|---|---|---|
| गणित | 50 | 200 |
| बुद्धिमत्ता | 25 | 50 |
| इंग्रजी | 25 | 50 |
| सामान्य विज्ञान | 25 | 50 |
| सामाजिक शास्त्र | 25 | 50 |
| एकूण | 150 | 400 |
-
परीक्षेचा कालावधी: 180 मिनिटे
-
परीक्षा वेळ: दुपारी 2 ते 5
-
प्रश्नपत्रिकेचे माध्यम: इंग्रजी
-
चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन नाही.
अर्ज फी | Application Fee :
-
सर्वसाधारण, संरक्षण दलातील कर्मचारी व माजी सैनिकांची मुले आणि OBC-NCL: ₹850
-
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST): ₹700
महत्वाच्या तारीख | Important Dates :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 नोव्हेंबर 2026
-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 डिसेंबर 2026 (रात्री 11:50 वाजेपर्यंत)
-
विलंब शुल्कासह अर्ज करण्याचा कालावधी: 3 ते 6 डिसेंबर 2026
-
विलंब शुल्कासह अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 6 डिसेंबर 2026 (रात्री 11:50 वाजेपर्यंत)
-
अर्जातील दुरुस्ती करण्याचा कालावधी: 7 ते 9 डिसेंबर 2026
-
परीक्षा शहराची घोषणा: 11 जानेवारी 2027
-
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख: 25 जानेवारी 2027
-
AISSEE 2027 प्रवेश परीक्षा: 31 जानेवारी 2027
- निकाल जाहीर होण्याची तारीख: नंतर अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.
महत्वाच्या लिंक | Important Link :
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) |
येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा