SBI Clerk Bharti 2026: सरकारी बँकेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ज्युनियर असोसिएट (क्लर्क) – Customer Support & Sales पदांच्या 1538 रिक्त जागांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा काळजीपूर्वक वाचाव्यात.
SBI Clerk Bharti 2026
एकूण जागा | Total Post : 1538
पदाचे नाव | Post Name : ज्युनियर असोसिएट (क्लर्क) (Customer Support & Sales)
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा | Age Limit :
01 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय:
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 28 वर्षे
वयोमर्यादेत सवलत
- SC/ST: 05 वर्षे
- OBC: 03 वर्षे
- शासनाच्या नियमानुसार इतर प्रवर्गांना लागू सवलत.
अर्ज फी | Application Fee:
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General / OBC / EWS | ₹750/- |
| SC / ST / PWD / Ex-Servicemen | फी नाही |
निवड प्रक्रिया | Selection Process :
SBI Clerk भरतीसाठी निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल.
- पूर्व परीक्षा (Preliminary Examination)
- मुख्य परीक्षा (Main Examination)
- दस्तऐवज पडताळणी
- अंतिम गुणवत्ता यादी
परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक :
- पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026
- मुख्य परीक्षा: ऑक्टोबर / नोव्हेंबर 2026
नोकरीचे ठिकाण | Job Location :
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतातील SBI शाखांमध्ये केली जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / ओळखपत्र
- पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज कसा करावा? | How to apply? :
- SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- SBI Clerk Recruitment 2026 या भरतीची जाहिरात उघडा.
- सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
- भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
- ऑनलाइन अर्ज सुरू : सुरू
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2026
- पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026
- मुख्य परीक्षा : ऑक्टोबर / नोव्हेंबर 2026
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
