Directorate Of Sports And Youth Services Recruitment 2023: महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Maharashtra Sports Department Bharti 2023
एकूण जागा : 111 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | क्रीडा अधिकारी | 59 |
2 | क्रीडा मार्गदर्शक | 50 |
3 | निम्न श्रेणीतील लघुलेखक | 01 |
4 | शिपाई | 01 |
एकूण जागा | 111 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
क्रीडा अधिकारी :
- सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य / विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
- नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
- शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा
- एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
क्रीडा मार्गदर्शक :
- सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
- नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
- शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा
- एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
निम्न श्रेणीतील लघुलेखक:
- माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
- १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
शिपाई :
- माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
एवढा मिळेल पगार (Salary) :
- क्रीडा अधिकारी S-14 (38,600-1,22,800)
- क्रीडा मार्गदर्शक S-14 (38,600-1,22,800)
- निम्न श्रेणीतील लघुलेखक S-14 (38,600-1,22,800)
- शिपाई S-1 (1,5000-47,600)
अर्ज फी (Application Fee) :
- अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
- इतर पर्वर्ग – रु. 900/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा