IOCL Apprentice Bharti 2026: ना लेखी परीक्षा, ना मुलाखत! केवळ मार्कांच्या आधारे इंडियन ऑइलमध्ये भरती; 12वी, डिप्लोमा, पदवीधरांना संधी!

IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. IOCL च्या Pipelines Division अंतर्गत विविध टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ट्रेडमध्ये एकूण 500 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 डिसेंबर 2026 आहे.

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.

IOCL Apprentice Bharti 2026

एकूण जागा : 500

विभागाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

विभागाचे नाव पद संख्या
Eastern Region Pipelines (ERPL) 116
Western Region Pipelines (WRPL) 149
Northern Region Pipelines (NRPL) 110
Southern Region Pipelines (SRPL) 46
South Eastern Region Pipelines (SERPL) 79
एकूण जागा 500

शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

1. Technician Apprentice (Mechanical):

  • मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.

2. Technician Apprentice (Electrical):

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

3. Technician Apprentice (Telecommunication & Instrumentation):

  • इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.

4. Trade Apprentice (Assistant-Human Resource):

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation) असणे आवश्यक आहे.

5. Trade Apprentice (Accountant):

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) पूर्ण केलेली असावी.

6. Data Entry Operator (Fresher Apprentices):

  • किमान 12वी उत्तीर्ण आणि पदवीपूर्व असावा.

7. Domestic Data Entry Operator (Skill Certificate Holders):

  • 12वी उत्तीर्ण आणि पदवीपूर्व असावा. तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडून एक वर्षापेक्षा कमी कालावधीचे Domestic Data Entry Operator स्किल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा | Age Limit :

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 24 वर्षे

  • वयाची गणना करण्याची तारीख: 30 नोव्हेंबर 2026

वयामध्ये सवलत:

  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट.

  • OBC (NCL) उमेदवारांना 3 वर्षे सूट.

  • PwBD उमेदवारांना 10 वर्षे सूट.

आवश्यक कागदपत्रे | Required Documents :

कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  1. दहावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.

  2. बारावीची गुणपत्रिका (लागू असल्यास).

  3. पदवी किंवा डिप्लोमा गुणपत्रिका.

  4. अंतिम पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र.

  5. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).

  6. आधार कार्ड.

  7. पॅन कार्ड.

  8. आधार लिंक असलेल्या बँक पासबुकचे पहिले पान.

  9. रद्द केलेला चेक (Cancelled Cheque).

  10. पासपोर्ट साईज फोटो.

  11. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र.

     

महत्वाच्या तारखा | Important Dates : 

  • ऑनलाइन अर्ज सुरू :  06 नोव्हेंबर 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  05 डिसेंबर 2026

महत्वाच्या लिंक | Important Link :

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!