Maharashtra CM Fellowship 2026: महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील तरुणांना शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची आणि प्रशासनाचा अनुभव घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. सार्वजनिक धोरण (Public Policy), प्रशासन आणि विकास क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. तसेच फेलोंना दरमहा आकर्षक मानधन, प्रशिक्षण आणि अनुभवी अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव दिला जाईल.
Maharashtra CM Fellowship 2026
मुख्यमंत्री फेलोशिप 2026 पात्रता
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे (किमान 60% गुण आवश्यक) असावा.
- उमेदवाराचे वय शासनाच्या नियमांनुसार असावे.
- संगणक ज्ञान आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहील.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 – पात्रता आणि इतर माहिती
अनुभव
- उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. व्यावसायिक अनुभवासोबत इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप किंवा आर्टिकलशिपचा एक वर्षाचा अनुभव देखील ग्राह्य धरला जाईल. तसेच पूर्णवेळ स्वयंसेवा किंवा स्वयंउद्योजकतेचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भातील आवश्यक पुरावे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
भाषा आणि संगणक ज्ञान
- उमेदवाराला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. संगणक हाताळणी आणि इंटरनेट वापराचे ज्ञान आवश्यक राहील.
वयोमर्यादा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे असावे.
अर्ज करण्याची पद्धत
- अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन प्रणालीमार्फतच अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज शुल्क
- अर्ज करताना उमेदवारांना ₹500/- शुल्क भरावे लागेल.
फेलोंची संख्या
- या कार्यक्रमांतर्गत एकूण 60 फेलोंची निवड केली जाणार आहे. त्यापैकी 1/3 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतील. आवश्यक पात्र महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या जागांवर पुरुष उमेदवारांची निवड केली जाईल.
फेलोंचा दर्जा
- निवड झालेल्या फेलोंना राज्य शासनातील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष दर्जा दिला जाईल.
निवड प्रक्रिया
- फेलोंची निवड प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करणे, अर्ज मागविणे, अर्जांची छाननी, परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यांद्वारे पार पडेल. निवड झालेल्या उमेदवारांना विविध शासकीय विभाग, प्रकल्प किंवा संस्थांमध्ये नियुक्त केले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या माध्यमातून राबविण्यात येईल.
मुख्यमंत्री फेलोशिप 2026 फायदे
- महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी
- दरमहा मानधन
- Public Policy आणि प्रशासन क्षेत्रातील अनुभव
- वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी
- प्रमाणपत्र आणि करिअरसाठी मोठी संधी
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचा आधिकृत GR पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈


