Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026: वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी वसई-विरार महानगरपालिका सरळसेवा भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीद्वारे कनिष्ठ अभियंता, लिपिक-टंकलेखक, विजतंत्री, सर्व्हेअर, उद्यान निरीक्षक, अग्निशमन केंद्र अधिकारी यांसह एकूण 18 संवर्गांतील 156 पदे भरली जाणार आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांना 26 नोव्हेंबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून मुदतीपूर्वी अर्ज करावा.
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026
एकूण जागा : 156
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 07 |
| 2 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 02 |
| 3 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 50 |
| 4 | उद्यान निरीक्षक | 03 |
| 5 | सहाय्यक रसायनतंत्रज्ञ | 02 |
| 6 | आरेखक | 04 |
| 7 | सर्व्हेअर | 04 |
| 8 | विजतंत्री | 10 |
| 9 | आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक | 01 |
| 10 | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
| 11 | लिपिक-टंकलेखक | 50 |
| 12 | सहाय्यक विधी अधिकारी | 01 |
| 13 | सांख्यिकी अधिकारी | 01 |
| 14 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
| 15 | गाळणी निरीक्षक | 03 |
| 16 | अग्निशमन केंद्र अधिकारी | 02 |
| 17 | उप-अग्निशमन केंद्र अधिकारी | 04 |
| 18 | प्रमुख अग्निशमन विमोचक | 10 |
| एकूण | 18 संवर्ग | 156 |
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1. कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 7 पदे
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी किंवा समतुल्य शाखेतील पदविका आणि 3 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असावा.
-
किंवा विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण असावी.
2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 2 पदे
-
यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदविका आणि 3 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असावा.
-
किंवा यांत्रिकी/ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण असावी.
3. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 50 पदे
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका आणि 3 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असावा.
-
किंवा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण असावी.
4. उद्यान निरीक्षक – 3 पदे
- – B.Sc. (Horticulture/Agriculture/Botany/Forestry) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण असावी.
5. सहाय्यक रसायनतंत्रज्ञ – 2 पदे
-
रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र विषयातील M.Sc. पदव्युत्तर पदवी असावी.
-
जलशुद्धीकरण व पाण्याच्या रासायनिक तपासणीचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
6. आरेखक (Draftsman) – 4 पदे
-
राज्य माध्यमिक (SSC) किंवा उच्च माध्यमिक (HSC) परीक्षा उत्तीर्ण असावी.
-
शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
7. सर्व्हेअर – 4 पदे
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेतील पदविका असावी.
-
किंवा SSC उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त ITI संस्थेचे 2 वर्षांचे सर्व्हेअर व्यवसायाचे प्रमाणपत्र असावे.
-
मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिटाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
8. विजतंत्री (Electrician) – 10 पदे
-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) मंडळाची परीक्षा उत्तीर्ण असावी.
-
शासनमान्य ITI संस्थेचा विजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
9. आरोग्य निरीक्षक/स्वच्छता निरीक्षक – 1 पद
-
किमान उच्च माध्यमिक (HSC) परीक्षा उत्तीर्ण असावी.
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, विशेषतः विज्ञान शाखेतील पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल.
-
स्वच्छता निरीक्षक म्हणून अनुभव असल्यास विशेष प्राधान्य.
10. सहाय्यक ग्रंथपाल – 1 पद
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालयशास्त्रातील B.Lib. पदवी असावी.
-
M.Lib. पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.
-
शासकीय, निमशासकीय किंवा शैक्षणिक संस्थांमधील अनुभवास प्राधान्य.
11. लिपिक टंकलेखक – 50 पदे
-
माध्यमिक शालांत (SSC) परीक्षा उत्तीर्ण असावी.
-
मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असावी.
-
MS-CIT किंवा जाहिरातीत नमूद समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
-
मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
12. सहाय्यक विधी अधिकारी – 1 पद
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेतील पदवी असावी.
-
शासकीय/निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील न्यायालयीन कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव किंवा सत्र न्यायालयातील 5 वर्षांचा वकिलीचा अनुभव आवश्यक आहे.
13. सांख्यिकी अधिकारी – 1 पद
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी असावी.
-
सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
14. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1 पद
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी आणि राज्य शासनाची DMLT पदवी असावी.
-
किंवा सूक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी असावी.
-
संबंधित रासायनिक पृथक्करणाचा 3 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
15. गाळणी निरीक्षक (Filter Inspector) – 3 पदे
-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील B.Sc. (Chemistry) पदवी असावी.
-
फिल्टर वॉटर ट्रीटमेंट प्लांट चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
16. अग्निशमन केंद्र अधिकारी – 2 पदे
-
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असावी.
-
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा Station Officer and Instructor अभ्यासक्रम किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचा 1 वर्षाचा संबंधित अभ्यासक्रम किंवा जाहिरातीत नमूद समतुल्य पात्रता असावी.
-
MS-CIT, मराठी भाषेचे ज्ञान, शारीरिक पात्रता आणि संबंधित पदावरील अनुभव आवश्यक आहे.
17. उप-अग्निशमन केंद्र अधिकारी – 4 पदे
-
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असावी.
-
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांची B.E. Fire पदवी किंवा Division Fire Officer अभ्यासक्रमाची प्रगत पदविका किंवा जाहिरातीत नमूद समतुल्य पात्रता असावी.
-
MS-CIT, मराठी भाषेचे ज्ञान आणि संबंधित पदावरील अनुभव आवश्यक आहे.
18. प्रमुख अग्निशमन विमोचक (Leading Fireman) – 10 पदे
-
माध्यमिक शालांत (SSC) परीक्षा उत्तीर्ण असावी.
-
राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिन्यांचा अग्निशामक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
-
MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावी.
-
अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक-विमोचक किंवा चालक-यंत्रचालक पदावर किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा | Age Limit :
वयोमर्यादा दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी मोजण्यात येईल.
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा : 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा : 43 वर्षे
दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त आणि इतर पात्र प्रवर्गांसाठी जाहिरातीत नमूद नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.
वेतनश्रेणी :
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पदाच्या वेतनस्तराप्रमाणे वेतन मिळेल.
- S-6 : ₹19,900 ते ₹63,200
- S-8 : ₹25,500 ते ₹81,100
- S-10 : ₹29,200 ते ₹92,300
- S-13 : ₹35,400 ते ₹1,12,400
- S-14 : ₹38,600 ते ₹1,22,800
- S-15 : ₹41,800 ते ₹1,32,300
अर्ज फी | Application Fee :
| उमेदवारांचा प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹1,000 |
| मागासवर्गीय | ₹900 |
| अनाथ | ₹900 |
| दिव्यांग | ₹900 |
| आर्थिक दुर्बल घटक | ₹900 |
| माजी सैनिक | ₹0 |
परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
निवड प्रक्रिया | Selection Process :
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
- ऑनलाइन अर्ज नोंदणी.
- पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा.
- परीक्षेतील गुणांनुसार गुणवत्ता यादी.
- आवश्यक कागदपत्रांची पडताळणी.
- अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी.
गट-क पदांसाठी मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही. परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू | 26 नोव्हेंबर 2026 |
| ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 डिसेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 17 डिसेंबर 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 7 दिवस आधी |
| ऑनलाइन परीक्षा | अधिकृत वेबसाइटवर जाहीर होईल |
अर्ज कसा करावा? | How To Apply?
- सर्वप्रथम वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- भरती 2026 संबंधित जाहिरात आणि ऑनलाइन अर्जाची लिंक उघडा.
- नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
- शैक्षणिक माहिती आणि वैयक्तिक तपशील काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- प्रवर्गानुसार परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा.
- अर्ज अंतिम सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
महत्वाच्या लिंक | Important Link :
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) |
येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा