Central Railway Bharti: रेल्वे मध्ये 2861 जागांसाठी मेगा भरती! मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांसाठी अर्ज सुरू

Central Railway Apprentice Bharti 2026: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत अप्रेंटिस कायदा 1961 नुसार विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे एकूण 2,861 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत.

या भरतीमध्ये मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या विभागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी भरतीची संपूर्ण माहिती तपासून अधिकृत सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करावा.




एकूण जागा : 2,861

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ  क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या
1 अप्रेंटिस मुंबई 1712
भुसावळ 500
पुणे 271
नागपूर 221
सोलापूर 157
एकूण जागा  2861

शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

  • उमेदवार किमान 50% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • संबंधित ट्रेडमध्ये NCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मान्यताप्राप्त ITI ट्रेड:

Fitter, Welder, Carpenter, Painter (General), Tailor (General), Electrician, Machinist, Turner, Instrument Mechanic, Electronics Mechanic, PASAA, Mechanic Diesel, Mason, Pipe Fitter, Blacksmith, Cable Jointer, Wireman, Mechanic Auto Electrical and Electronics, Mechanic-cum-Operator (Electronics Communication System), Mechanic Communication Equipment Maintenance, Mechanic Radio and TV, Information and Communication Technology System Maintenance, Sheet Metal Worker, Mechanic Machine Tools Maintenance, Mechanic Motor Vehicle, Armature Coil Winder आणि Stenographer (English/Hindi).

वयोमर्यादा | Age Limit : 

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 03 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामध्ये सवलत:

  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट.

अर्ज फी | Application Fee :

प्रवर्ग फी
General / OBC ₹100/-
SC / ST / PWD / महिला शुल्क नाही

महत्वाच्या तारखा | Important Dates : 

  • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: 03 नोव्हेंबर 2026

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 03 नोव्हेंबर 2026

  • अर्ज सुरू होण्याची वेळ: सकाळी 11:00 वाजता

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 02 डिसेंबर 2026

  • अर्ज करण्याची अंतिम वेळ: सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्वाच्या लिंक | Important Link :

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!