Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026: महाराष्ट्रात 1,539 तलाठी पदांची मेगा भरती; पहा संपूर्ण जाहिरात | MPSC Group C Bharti 2026

Talathi Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांच्या 1,539 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार अर्जाची मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.




Talathi Bharti 2026

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नावपदसंख्या
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)1,539
वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल22
सहायक अधीक्षक11
सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक)254
लिपिक-टंकलेखक (विविध विभाग)230
लिपिक-टंकलेखक (अन्न नागरी पुरवठा)155
लिपिक-टंकलेखक (आदिवासी विकास विभाग)69
लिपिक-टंकलेखक (महसूल विभाग)480
लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग)328




पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

  1. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क – सांविधिक (Statutory) विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल, गट-क – कोणत्याही शाखेतील पदवी.
  3. सहाय्यक अधीक्षक, गट-क – कोणत्याही शाखेतील पदवी.
  4. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क – मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील B.F.Sc. पदवी.
  5. लिपिक-टंकलेखक (नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय) – कोणत्याही शाखेतील पदवी व जाहिरातीनुसार आवश्यक मराठी/इंग्रजी टंकलेखन पात्रता.
  6. लिपिक-टंकलेखक (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग) – कोणत्याही शाखेतील पदवी व जाहिरातीनुसार आवश्यक मराठी/इंग्रजी टंकलेखन पात्रता.
  7. लिपिक-टंकलेखक (आदिवासी विकास विभाग) – कोणत्याही शाखेतील पदवी व जाहिरातीनुसार आवश्यक मराठी/इंग्रजी टंकलेखन पात्रता.
  8. पिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग) – कोणत्याही शाखेतील पदवी व जाहिरातीनुसार आवश्यक मराठी/इंग्रजी टंकलेखन पात्रता.
  9. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) – कोणत्याही शाखेतील पदवी व जाहिरातीनुसार आवश्यक मराठी/इंग्रजी टंकलेखन पात्रता.

वयोमर्यादा

  • जाहिरातीनुसार लागू.
  • काही पदांसाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत उपलब्ध.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: Online

अर्ज फी : 

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) / अनाथ: ₹294/-
  • माजी सैनिक: ₹44/-




महत्त्वाचे बदल

  • नवीन पदांचा समावेश.
  • एकूण पदसंख्या आता 3,088.
  • अर्जाची अंतिम तारीख वाढविण्यात आली.
  • परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो व स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • टंकलेखन प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अर्ज कसा करावा?

  1. MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Group C 2026 भरती लिंकवर क्लिक करा.
  3. नोंदणी करून अर्ज भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. परीक्षा शुल्क भरा.
  6. अर्ज अंतिम सबमिट करून प्रिंट जतन करा.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026 05 ऑगस्ट 2026 (वाढविण्यात आली)
  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 06 ऑगस्ट 2026
  • पूर्व परीक्षा (Offline): 27 सप्टेंबर 2026 25 ऑक्टोबर 2026 (सुधारित)

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top