AIIMS CRE Bharti 2026

AIIMS CRE Bharti 2026: 10वी, 12वी पास, ITI ते पदवीधरांसाठी AIIMS मध्ये 1400+ जागांची मेगाभरती; ऑनलाईन अर्ज करा!

AIIMS CRE Bharti 2026: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) ग्रुप B आणि ग्रुप C अंतर्गत विविध १४०० पेक्षा जास्त पदांसाठी Common Recruitment Examination (CRE-5-2026) ची घोषणा केली आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे असिस्टंट डायटिशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (JAA), निम्न श्रेणी लिपिक (LCC), असिस्टंट इंजिनिअर यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती, पात्रता आणि अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.

AIIMS CRE Bharti 2026




AIIMS CRE Recruitment 2026 Overview

भरतीचा विभाग अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)
जाहिरात क्रमांक 93/2026
परीक्षेचे नाव सामायिक भरती परीक्षा (CRE 5-2026)
एकूण जागा १४००+ जागा
पदाचे नाव ग्रुप B आणि ग्रुप C (विविध पदे)
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (All India)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online)




पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

या मेगाभरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदासाठी अर्ज करू शकता.

  • पदे: असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक (LCC), असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे.

  • शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे किमान 10वी उत्तीर्ण / 12वी उत्तीर्ण / ITI / पदवीधर (Graduate) / पदव्युत्तर पदवी (Post Graduate) / B.Sc / M.Sc / MSW / इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. (विशिष्ट पदाच्या पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.)

वयाची अट (Age Limit)

०३ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय पदाच्या आवश्यकतेनुसार २५ / २७ / ३० / ३५ / ४० / ४५ वर्षांपर्यंत असावे.

  • मागासवर्गीयांसाठी सूट: SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे तर OBC उमेदवारांना ०३ वर्षे वयात सूट मिळेल.

परीक्षा शुल्क (Application Fee)

  • General / OBC उमेदवार: ₹३०००/-

  • SC / ST / EWS उमेदवार: ₹२४००/-

  • PWD (दिव्यांग) उमेदवार: कोणतीही फी नाही.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ जुलै २०२६

  • परीक्षा तारीख (CBT): २५ ते २७ जुलै २०२६

 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top