UPSC Free Coaching Maharashtra

SIAC CET 2026: महाराष्ट्र शासनातर्फे UPSC पूर्व परीक्षा मोफत प्रशिक्षणासाठी सुवर्णसंधी! लवकर अर्ज करा

SIAC CET 2026-27: जर तुमचे स्वप्न IAS, IPS किंवा IFS अधिकारी बनण्याचे असेल आणि तुम्ही UPSC नागरी सेवा परीक्षेची (Civil Services Exam) तयारी करत असाल, तर महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी आणली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई आणि इतर नामांकित केंद्रांवर UPSC पूर्व परीक्षा २०२७ साठी पूर्णवेळ मोफत (विनावूल्य) प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (CET) सुधारित वेळापत्रक आणि मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना (क्रमांक-एसआयएसी/२०२६-२७/सीईटी/सूचना/३८०) प्रसिद्ध करण्यात आली आहे.




उपलब्ध जागा

राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये एकूण 560 जागा उपलब्ध आहेत. विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना देखील शासनाच्या नियमानुसार प्राधान्य दिले जाईल.

SIAC CET 2026 साठी पात्रता

  • उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • UPSC नागरी सेवा परीक्षा देण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार आरक्षणाचा लाभ दिला जाईल.

प्रशिक्षण केंद्रे (Coaching Centres)

SIAC CET 2026 अंतर्गत खालील संस्थांमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाईल –

  • राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण संस्था (SIAC), मुंबई
  • Pre-IAS Training Centre (PITC), नाशिक
  • PITC, कोल्हापूर
  • PITC, छत्रपती संभाजीनगर
  • PITC, अमरावती
  • PITC, नागपूर
  • ACEC, YASHADA, पुणे
  • Savitribai Phule Academy, PCMC, पुणे




SIAC CET 2026 परीक्षा पद्धत

Section-I : सामान्य अध्ययन

  • प्रश्नसंख्या: 50
  • गुण: 100
  • माध्यम: हिंदी व इंग्रजी
  • स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ)

Section-II : CSAT

  • प्रश्नसंख्या: 40
  • गुण: 100
  • माध्यम: हिंदी व इंग्रजी
  • स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ)

निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या एक-तृतीयांश (0.33%) गुणांची कपात केली जाईल.




अंतिम निवड प्रक्रिया

उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी खालील आधारावर तयार केली जाईल –

  1. CET लेखी परीक्षेतील गुण
  2. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
  3. निवडलेल्या प्रशिक्षण केंद्राचा पर्याय

अर्ज कसा करावा?

  1. SIAC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. परीक्षा शुल्क भरा.
  5. अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा.

SIAC CET 2026-27 चे सुधारित वेळापत्रक (Important Dates)

प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे, उमेदवारांनी या तारखांची नोंद घ्यावी:

तपशील दिनांक
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात

०१ जून २०२६

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख

३० जून २०२६

परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

०२ जुलै २०२६ पर्यंत

CET परीक्षा दिनांक (Offline Mode)

०२ ऑगस्ट २०२६

अधिकृत संकेतस्थळ

या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या सविस्तर सूचना पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी:




मित्रांनो, UPSC सारख्या कठीण परीक्षेसाठी दर्जेदार आणि मोफत मार्गदर्शन मिळणे ही एक मोठी संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२६ आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच तुमचा अर्ज सादर करा.

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top