Maharashtra State Security Corporation Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (Retd. ACP) आणि निवृत्त पोलीस निरीक्षक (Retd. PI) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 13 पदे उपलब्ध असून पात्र सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत संबंधित पत्त्यावर सादर करावा.
MSSC Bharti 2026
एकूण जागा : 13
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:
| अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे |
|---|---|---|
| 1 | Retd. ACP (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) | 03 |
| 2 | Retd. PI (निवृत्त पोलीस निरीक्षक) | 10 |
| एकूण | 13 | |
शैक्षणिक पात्रता:
Retd. Assistant Commissioner of Police (ACP :
- महाराष्ट्र राज्य पोलीस दल किंवा राज्य राखीव पोलीस दलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उपअधीक्षक (सशस्त्र/निःशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी या पदासाठी पात्र आहेत.
Retd. Police Inspector (PI)
- महाराष्ट्र राज्य पोलीस दल किंवा राज्य राखीव पोलीस दलातून पोलीस निरीक्षक (सशस्त्र/निःशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी या पदासाठी पात्र आहेत.
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
संबंधित विभागात वास्तव्यास असलेल्या आणि त्याच विभागातील पोलीस खात्यात सेवा केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2026 रोजी 61 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
पगार:
| पद | मासिक मानधन |
|---|---|
| Retd. ACP | ₹50,000/- |
| Retd. PI | ₹45,000/- |
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज किंवा BIO-DATA तयार करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने अर्ज सादर करावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,
सेंटर-1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर,
कफ परेड, मुंबई – 400 005.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे. अर्ज सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत स्वीकारले जातील.
महत्त्वाचे: अर्ज अंतिम मुदतीपूर्वी संबंधित पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- वैयक्तिक माहिती / BIO-DATA
- शैक्षणिक कागदपत्रे
- सेवानिवृत्ती प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
- निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
- फोटो, PAN Card आणि Aadhaar Card
- मागील पाच वर्षांचे ACR
मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात.
निवड प्रक्रिया:
प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखत, अनुभव आणि उपलब्ध पदांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना महामंडळाच्या नियम व अटींनुसार नियुक्तीपत्र देण्यात येईल. नियुक्ती करार पद्धतीने 11 महिन्यांसाठी असणार आहे.
महत्त्वाच्या सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज विहित नमुन्यातच सादर करा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
- अर्जाची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2026, सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आहे.
- अर्ज वेळेत संबंधित पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रियेसंदर्भातील अंतिम निर्णय महामंडळाचा राहील.
महत्त्वाच्या लिंक
| लिंक | |
|---|---|
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |

