Talathi Exam Date 2023 Maharashtra

तलाठी भरती परिक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत; इथे पहा | Talathi Exam Date 2023 Maharashtra

Talathi Exam Date 2023 Maharashtra: महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र. ४५/२०२३ दि.२६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी भरती परीक्षेकरिता TCS कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या आहेत. सदर परिक्षा दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असेल सदर परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.



Talathi Exam Date 2023 Maharashtra

परीक्षा तारीख :

  • पहिला टप्प्पा :  १७, १८, १९, २०, २१, २२ऑगस्ट
  • दुसरा टप्पा : २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा : ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

परीक्षा वेळ :

  • सत्र १ ले सकाळी ९.०० ते ११.००
  • सत्र २ रे दुपारी १२.३० ते २.३०
  • सत्र ३ रे सायंकाळी ४.३० ते ६.३०





उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाईल. परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपुर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे..




मूळ जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top