vanrakshak bharti 2023

vanrakshak bharti 2023: वनविभागातील वनरक्षक पदाच्या तब्बल 2138 जागांसाठी मेगा भरती सुरु | मुदत वाढली – 3 जुलै 2023 शेवटची तारीख

vanrakshak bharti 2023: वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळाववरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची उमेदवारांची राहील.


Vanrakshak Bharti 2023

एकूण जागा : 2138

पदाचे नाव : वनरक्षक 

विभागाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र  विभागाचे नाव  पद संख्या 
1 नागपूर विभाग  277
2 चंद्रपूर विभाग  122
3 गडचिरोली विभाग  200
4 अमरावती विभाग  250
5 यवतमाळ विभाग  79
6 औरंगाबाद विभाग  83
7 धुळे विभाग  246
8 नाशिक विभाग  99
9 पुणे विभाग  73
10 ठाणे विभाग  460
11 कोल्हापूर विभाग  249
एकूण जागा  2138




वनरक्षक भरती पात्रता | Vanrakshak Bharti Qualification 

  1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  3. माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

(टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)

  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे आवश्यक आहे.



👉वनरक्षक भरतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लीक करा 👈

वनरक्षक भरती शारीरिक पात्रता | Forest Guard Recruitment Physical Qualification

maharashtra van vibhag bharti 2023

maharashtra van vibhag bharti 2023

प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे.

(क) शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल, वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा, रंग व रात आंधळेपणा, आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, सपाट पाय, त्वचा व छातीचे रोग या संबंधिचा आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन- दुय्यम संवर्ग) यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील.

(ड) शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेल्या किंवा गभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचा-याचे मुलांना खाली नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल..

  1. उंची :- पुरुष व स्त्री उमेदवारासाठी २.५ से.मी.
  2. छाती : मोजणी आवश्यक नाही.

(इ) खेळाडू प्रवर्ग विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमार्यादेची अट पूर्ण करणा-या खेळाडूंना, विहित उंचीमध्ये २.५ से. मी. इतकी सवलत देण्यात येईल.

(फ) वन कर्मचा-याचे पाल्यांना शारीरिक अर्हतेत सवलत :- सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या वन कर्मचा-यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारिरीक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येईल.

(ए)

  1. उंची:- पुरुष आणि स्त्री उमेदवारास २.५ से.मी.
  2. छाती:- पुरुष उमेदवारांना २.० से.मी. न फुगवता व १.५ से.मी. फुगवून



वनरक्षक भरती पात्रता वयोमर्यादा | Forest Guard Recruitment Eligibility Age Limit

Forest Guard Recruitment Eligibility Age Limit

वन विभाग भरती परीक्षा फी | Forest Department Recruitment Examination Fee
प्रवर्ग  शुल्क 
अमागास रु.९००/-
मागासवर्गीय / आ.दु.घ/ अनाथ रु.१०००/-
माजी सैनिक
  • माजी सैनिक यांना शासन निर्णय क्र. आरटीए १०७९/०/४८२/XVI-A, दिनांक ३/७/१९८० नुसार परीक्षा शुल्कातून सूट देण्यात येत आहे.
  • परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

पगार (Salary) :  S-7 रु. 21,700 ते 69,100/-.

अर्ज पद्धती : ऑनलाइन.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 जून 2023.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 30 जून 2023 03 जुलै 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top