HSC Board Exam Results 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
HSC Board Exam Results 2023
12 वी चा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईट जाऊन निकाल पाहू शकता.
- mahresult.nic.in
- https://hsc.mahresults.org.in
- http://hscresult.mkcl.org
- https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/
- http://mh12.abpmajha.com/
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्याच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
असा चेक करा निकाल – HSC Board Exam Results 2023
1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
4. “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
5. महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
6. भविष्यातील वापरासाठी Save करा.
अशाच नव नवीन माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा