SPI Aurangabad Entrance Exam 2023

महाराष्ट्रातील युवकांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी | SPI Aurangabad Entrance Exam 2023

SPI Aurangabad Entrance Exam 2023: सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जावे ह्यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. संस्थेच्या पुढील ४७ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. संपूर्ण माहिती खालील लेखात दिली आहे. 


SPI Aurangabad Entrance Exam 2023

पात्रता :-

  1. अविवाहित (मुलगा).
  2. महाराष्ट्राचा अधिवासी (Domicile)
  3. जन्म तारीख ०१ जुलै २००६ ते ३१ डिसेंबर २००८ च्या दरम्यान.
  4. मार्च एप्रिल / मे २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा.
  5. जुन-२०२३ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

शारिरीक पात्रता :-

सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा.

  1. उंची – १५७ से.मी.
  2. वजन – ४३ कि.ग्रा.
  3. छाती – न फुगवता ७४ से.मी. फुगवून- ७९ से.मी
  4. रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा.
  5. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या आधिसूचनेनुसार डोळयांची क्षमता असावी (eye power).




लेखी परीक्षा आणि मुलाखत :-

  • पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून ०९ एप्रिल २०२३ रोजी विविध केद्रांवर घेतली जाईल.
  • परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत १५० मार्कांचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ गणिताचे आणि ७५ सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असतील.
  • लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला (१) गुण मिळेल.
  • यशस्वी परीक्षार्थीना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.




अर्ज कसा करावा? | How To Apply For SPI Aurangabad Entrance Exam 2023 :

  • www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर अर्ज उपलब्ध आहे.
  • परीक्षा शुल्क रूपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकीग इत्यादी व्दारे भरावे.
  • डिमांड ड्राफ्ट किंवा चलानव्दारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही.
  • प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजुर होइल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
  • प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ १२ मार्च २०२३ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यत.
  • हॉल तिकीट : दिनांक ३० मार्च २०२३ सकाळी १०:०० वा. नंतर संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

परीक्षा संबधीत सुचनांसाठी वेळोवळी www.spiaurangabad.com हे संकेत स्थळ वेळोवळी तपासावे. इतर कोठेही हया बाबत सुचना दिल्या जाणार नाहीत.

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top