Thane Shahar Police Shipai Bharti

ठाणे शहर पोलीस शिपाई भरती | Thane Shahar Police Shipai Bharti

Thane Shahar Police Shipai Bharti: महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दि. २३.०६.२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ०९.११.२०२२ ते ३०.११.२०२२ या कालावधीत स्विकारण्यात येतील. हया बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahalt.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे.


Thane Shahar Police Shipai Bharti

उमेदवारास पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारिरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.



  • भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे.
  • शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.
  • लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यांत येईल.

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.



  • भरती प्रक्रियेदरम्यान शारिरीक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल.
  • कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
  • उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत.
  • मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.

पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६ / २०१७ बाबत होणान्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. १७५/२०१८ व इतर संलग्न याचिकामध्ये दि. २७.०६.२०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदाच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.

शासनाने लागू केलेले खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणान्या न्यायालयीन प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधिन असेल..


अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, मैदानी चाचणी, जिल्ह्यानुसार रिक्त पदांची संख्या, कागदपत्रेय पाहण्यासाठी 

image

येथे क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठी (Notification) : येथे क्लिक करा 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top