Maharashtra Police Bharti 2022

शासनाचा नवीन GR आला!! Police भरती ला लवकरच सुरवात | Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022: राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे. राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे ११४४३ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.


Maharashtra Police Bharti 2022

दरम्यान वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पदनि २०२२/प्र.क्र.२/२०२२ / आ.पु.क., दि. १२/०४/२०२२ अन्वये पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारीत आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे.

हे पण वाचा : मैदानी चाचणी प्रथमच होणार शासन निर्णय जाहीर; वाचा सविस्तर

सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संदर्भाधिन क्र. १ च्या शासन निर्णय, वित्त विभाग दि. १२/०४/२०२२ च्या तरतूदीमधून सूट मिळण्यासाठीच्या प्रस्तावास दि.२७/०९/२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मा. मंत्रिमंडळाच्या दि. २७/०९/२०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२१ मधील पोलीस शिपाई गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता संदर्भ क्र. १ येथील वित्त विभाग, शासन निर्णय दि. १२/०४/२०२२ मधील तरतूदींमधून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.




शासन निर्णय:

  • राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई, गट-क या संवर्गातील सन २०२१ या वर्षात विविध कारणास्तव रिक्त झालेली पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण ११४४३ पदे १०० % भरण्यास शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि ०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क., दि. १२/०४/२०२२ मधील तरतुदींमधून सूट देण्यात येत आहे.

हे पण वाचा : पोलीस भरती चालक नवीन GR 2022

  • प्रस्तुत प्रस्तावासाठी येणारा खर्च यासाठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. तसेच याद्वारेकोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदे भरण्यात यावीत..
  • सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१०१४१२१३२५६०२९ असा आहे. हा शासन निर्णय

 

पोलीस भरतीचा GR पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top