Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022: अग्निशामक दलात 900 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा!! नोव्हेंबरपासून मेगा भरती सुरु होणार

Fire Department Bharti 2022: मुंबई अग्निशमन दलात तब्बल ९०० जवानांची (अग्निशामक) भरती होणार असून नोव्हेंबरपासून याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. संधी मिळणाऱ्या जवानांना ३० हजारांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे. भरतीसाठी पालिकेने प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.


Fire Department Bharti 2022

  • मुंबईत आगीसह कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यासाठी हजर असतात.
  • अग्निशमन दलातील ३५०० पदांपैकी तब्बल ३० टक्के पदे रिक्त आहेत.
  • उपलब्ध कर्मचारी वर्गावर मोठा ताण असल्याने रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून अवजड वाहनांच्या वाहतूक लायसन्सचे गुणही मिळणार आहेत.
  • भरतीसाठी हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे.
  • लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वैद्यकीय चाचणी केल्यानंतर गुणवत्तेनुसार अग्निशामकांची भरती केली जाणार आहे.
  • भरतीसाठी ८०० मीटर धावणे, डमी बॉडी घेऊन पळणे, रस्सीद्वारे चढणे आदी चाचण्या होणार आहेत.
महिलांसाठी ३० टक्के आरक्षण

  • भरतीमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण असून उमेदवार पात्र न ठरल्यास पुरुष गटातून पात्र उमेदवारांची भरती होणार आहे
  • यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण होणार आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top