Police Bharti 2022

Police Bharti 2022: 20 हजार पोलिसांची भरती दोन टप्प्यात होणार; ऑक्टोबर मध्ये पहिला टप्पा सुरु होणार

Maharashtra Police Bharti 2022: राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे. 20 हजार पोलिसांची भरती दोन टप्प्यांत होणार. ऑक्टोबर २०२२ पासून भरतीचा पहिला टप्पा सुरु होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९ हजार ७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल.


Maharashtra Police Bharti 2022

राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरूणांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. २०१९ मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्तपदांची पोलिस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने सात हजार पोलिस भरतीची घोषणा केली. पण, त्याला मुहूर्त लागलाच नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार आता भरतीच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. २०२० मधील सात हजार २३१ तर २०२१ मधील १२ हजार ५२७ पदांची भरती दोन टप्प्यात केली जाणार आहे.




राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सुरु आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ‘महाआयटी’कडून सुरु आहे. काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानंतर ऑक्टोबर (पुढील महिन्यात) भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असेही सांगण्यात आले. २०२१ मधील रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशीही शक्यता आहे.

महाराष्ट्र पोलीस भरतीचे संभाव्य नियोजन (Police Bharti Maharashtra)

  • ७२३१ पदभरतीला शासनाची मान्यता (नक्षलग्रस्त गडचिरोली भागात २८९ व एसआरपीएफ बल क्र. १३मधील ५४ पदांचा समावेश)
  • पहिल्या टप्प्यातील पोलिस शिपाई भरती ऑक्टोबर २०२२ मध्ये होणार
  • २०२१ मध्ये पोलिस शिपाई १० हजार ४०४ तर चालक एक हजार ४०१ आणि सशस्त्र पेलिस शिपायांची ७२२ पदे रिक्त झाली असून त्याची दुसऱ्या टप्प्यात भरतीची शक्यता
  • २०१९ मध्ये भरती झालेल्यांचे प्रशिक्षण डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होईल; पहिल्यांदा २०२० मधील रिक्त पदांची भरती
  • ऑक्टोबरमधील भरती झालेल्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, त्यावेळी २०२१ मधील रिक्तपदांची भरती होईल




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top