Army Maratha Infantry Bharti 2022

Army Maratha Infantry Bharti 2022: आर्मी मराठा इन्फंट्री मध्ये मोठी भरती | 19 सप्टेंबर पासून सुरवात

Army Maratha Infantry Bharti 2022: मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे बेळगावात १९ सप्टेंबरपासून ‘अग्निवीर’ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सहा राज्यांसाठी शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे हा भरती मेळावा होणार आहे. या हा मेळावा कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यासाठी असणार आहे.


Army Maratha Infantry Bharti 2022

या भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

 • १९ सप्टेंबर २०२२ जनरल ड्यूटी पद फक्त उत्कृष्ट खेळाडूंसाठी.
 • २०, २१ सप्टेंबर २०२२ अग्नीवीर जनरल ड्यूटी पदासाठी फक्त महाराष्ट्राकरिता असणार आहे.
 • २२ सप्टेंबर २०२२ अग्निवीर जनरल ड्यूटी पदासाठी मध्यप्रदेश. छत्तीसगड, गुजरात आणि गोवा राज्यांकरिता शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपास करण्यात येणार आहे.
 • २३ सप्टेंबर २०२२ अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त कर्नाटक व आंध्र प्रदेशकरिता शारीरिक क्षमता आणि मोजमाप होणार आहे.
 • २४ सप्टेंबर २०२२ अग्रीवीर ट्रेड्समन पदासाठी सर्व जातींकरिता (फक्त लष्करात सेवा बजावणाऱ्या तसेच माजी सैनिकांसाठी) शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी होणार आहे.
 • २६ सप्टेंबर २०२२ अग्रीवीर क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल पदाकरिता सर्व वर्गांसाठी भरती होणार आहे.

यात उत्तीर्ण झालेल्या सर्व पदांसाठीची लेखी परीक्षा (सामान्य प्रवेश परीक्षा) नोव्हेंबर २०२२ मध्ये घेतली जाणार आहे.वयोमर्यादा व पात्रता अशी हवी :

या भरती मेळाव्यासाठी उमेदवाराचे वय १ ऑक्टोबर २०२२ रोजी पुढील प्रमाणे असले पाहिजे

वयोमर्यादा –

 • अग्रिवीर जीडी, अग्रिवीर ट्रेड्समन, अग्रिबार क्लार्क, एसकेटी पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्ष
 • (जन्म १ ऑक्टोबर १९९९ पूर्वी अथवा १ एप्रिल २००५ नंतर झालेला नसावा) इतकी असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता –

 • अग्रीवीर जनरल ड्युटी -पदासाठी प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण असावेत.
 • किमान ४५ टक्के गुण घेऊन १० वी उत्तीर्ण आवश्यक आहे.
 • वाहनचालक पदासाठी हलके वाहन (एलएमव्ही) चालक परवाना असलेल्यांना प्राधान्य असणार आहे.
 • अग्रिवीर क्लार्क स्टोअर किपर टेक्निकल पदासाठी कोणत्याही शाखेतून १२ वी परीक्षा प्रत्येक विषयात ५० टक्के गुणांसह एकूण ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण असावे.
 • अग्रिवीर ट्रेड्समन पदासाठी फक्त १० वी उत्तीर्ण  पुरेसे असले तरी प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण असले पाहिजेत.
 • खेळाडूंकडे विद्यापीठ, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अथवा अतिरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Army Maratha Infantry Bharti 2022

मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top