10th and 12th students scholarship

तुम्हाला महिती आहे का? 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार 25 हजारापर्यंत शिष्यवृत्ती | 10th And 12th Students Scholarship

10th and 12th students scholarship : पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्यसाठी शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.


10th and 12th students scholarship

योजनेचे नाव (Scheme Name) :

  • भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना

किती मिळणार शिष्यवृत्ती?

  • 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी – रु 15,000/-
  • 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी – रु 25,000/-

अर्थसहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देण्यात येणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी सुधारित शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटीत बसणाऱ्या मुलांच्या पालकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. सन २०२२ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी / इ.१२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे. तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी / रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०% आणि ४०% दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना/ कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक.
  2. शैक्षणिक अर्थसहाय्य हे इ. १०/१२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल.

सदर अर्ज ऑनलाइन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भरायचे आहेत. उपरोक्त योजनेचे अर्ज दि. 22 ऑगस्ट 2022 ते दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा
(Apply Online)
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top