Voter card Aadhar Link

Voter card Aadhar Link: आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करावे लागणार; असं करा लिंक…!

Voter card Link To Aadhar Card: आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या निर्णयानंतर आता मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक (Aadhar Voter card Link) करण्याचा नोठा निर्णय घेण्यात आलाय. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत. आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिलीय. देशपांडे यांना देशातील नागरिकांना 1 ऑगस्टपासून आपलं मतदान ओळखपत्र (Voter ID) आणि आधार कार्ड  (Aadhar card) लिंक करण्याचं आवाहन केलं आहे.




कोणकोणते महत्वाचे बदल?

  • पूर्वी 1 जानेवारी ही मतदार क्वालिफाईंगची तारीख होती. आता दर तीन महिन्याचा पहिला दिवस हा क्वालिफाईंग दिनांक असेल.
  • पोस्टल मतदानात स्पाऊस हा शब्द वाढवला आहे. जो अधिकार पतीला तोच अधिकार आता पत्नीला असेल.
  • मतदार यादीतील मतदारांचं आधार कार्डशी लिंकअप करण्यात येईल.  आधार आणि मतदान कार्डाशी संबंधित सर्व सुविधा मतदारांना मिळाव्यात. आधारमुळे योग्य मतदान ओळखता येणार. आधार नसेल तर 11 पैकी एक कागदपत्र मतदाराला बाळगणं महत्वाचं असेल.



असं करा लिंक (Voter card Link To Aadhar Card) :

  • मतदान कार्ड हे आधारशी लिंक करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 6 ‘ब’ भरावा लागणार आहे.
  • हा अर्ज तुम्हाला भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA माध्यमांवर हा अर्ज उपलब्ध राहील.
  • मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्रमांक 6 ‘ब’गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
  • जर तुमच्याकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्रमांक 6 ‘ब’मध्ये नमूद केल्यानुसार 11 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करता येईल.





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top