maharashtra Firefighters Cours

महाराष्ट्र अग्निशमन दलामध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी – Maharashtra Fire Service Course 2022

पाठयक्रम :

१. अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम (पुरुष व महिला उमेदवारांकरीता ३० महिला उमेदवार उपलब्ध झाल्यास हा पाठयक्रम आयोजित करण्यांत येईल).

२. उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम (फक्त पुरुष उमेदवारांकरीता पाठयक्रमाची क्षमता ४० )

तरुण व होतकरु तरुण /तरुणी उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक / अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण पाठयक्रम दरवर्षी आयोजित करतात. अग्निशामक पाठयक्रम (कालावधी ०६ महिने) व अधिकारी पाठयक्रम (कालावधी ०१ वर्ष हे दोन्ही पाठयक्रम निवासी असून या पाठयक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टीकोनातून हे पाठयक्रम आयोजित करण्यांत येतात.

हे अग्निशमन सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टीप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक / अधिकारी यांची मोठया प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले लातात. जरी हे क्षेत्र तरुण तडफदार युवकासाठी असले तरी प्रथमच तरुण युवतींसाठी पाठयक्रम आयोजित करण्यंत येत आहे. जर ३० महिला उमेदवार उपलब्ध झाल्यास हा त्यांचेसाठी अग्निशामक पाठयक्रम आयोजित करण्यांत येईल.




प्रवेशासाठी पात्रता :

  • खाली नमूद केल्याव्यतिरिक्त अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे व त्यास मराठी भाषा येणे गरजेचे आहे. सदर बाब शैक्षणिक व कागदपत्रांची पडताळणीच्या वेळी बघितली जाईल).

वयोमर्यादा : 

अग्निशामक पाठयक्रम –

  • १८ ते २३ वर्ष (ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रथम दिवशी उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण पाहिजेत).
  • (अनुसूचित जाती / अनुसूचित | जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गाकरीता ५ वर्षे शिथिल व इतर | मागासवर्गीय ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ०३ वर्षे शिथिल)

उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम –

  • १८ ते २५ वर्षे (ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रथम दिवशी उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण पाहिजेत).
  • (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गाकरीता ५ वर्षे शिथिल व इतर मागासवर्गीय / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ०३ वर्षे शिथिल)

शैक्षणिक पात्रता :

अग्निशामक पाठयक्रम –

  • पुरुष उमेदवारांसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान SSC उत्तीर्ण
  • (५० टक्के खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के (अनुसूचित व जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग / इतर मागासप्रवर्ग/ एसईबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांकरीता)
  • महिला उमेदवारांसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान SSC उत्तीर्ण

उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम –

  • मान्यताप्राप्त विदयापीठातून पदवी उत्तीर्ण  (५० टक्के खुल्या प्रवर्गासाठी व ४५ टक्के (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग / इतर मागास प्रवर्ग / एसईबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांकरीता)





शारीरिक पात्रता :

अग्निशामक पाठयक्रम 
पुरुष महिला
उंची १६५ सें.मी. (किमान) १५७ से.मी. (किमान )
वजन ५० किलो (किमान) ४६ किलो (किमान)
छाती ८१ सें.मी. (सर्वसाधारण)

८६ सें.मी. ( फूगवून)

(किमान ०५ से. मी. छाती फुगविणे आवश्यक आहे).

  –

 

उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम
पुरुष
उंची १६५ सें.मी. (किमान)
वजन ५० किलो (किमान )
छाती छाती ८१ सें.मी. (सर्वसाधारण) ८६ सें.मी. ( फूगवून)

(किमान ०५ से.मी. छाती फुगविणे आवश्यक आहे).





वैद्यकीय मापदंड (Medical criteria) :

  1. डोळे : अर्जदार डोळयांनी रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी ६/६ असणे आवश्यक आहे.
  2. कोणत्याही प्रकारचे कान, नाक व घसाचे आजारे नसणे. व्यवस्थित ऐकू येणे. या व्यतिरिक्त अर्जदार खाली दिलेल्या आजारातून मुक्त असणे गरजेचे आहे.
  • हाडांचा किंवा सांध्याचा आजार.
  • पूर्व मानसिक आजार
  • त्वचेचा आजार
  • सपाट पाय किंवा गुडघे टेकलेले
  • रक्त वाहिनी फूगणे
  • तिरकस डोळे ०७. कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंगत्व नसावे.
  • मोठया प्रमाणात शस्त्रकिंया झालेली नसावी
  • ऐकू न येणे किंवा बोलतांना अडथळणे (बोबडेपणा)
  • कोणत्याही प्रकारचे अपंगत्व, जेणेकरुन अग्निशमन किंवा विमोचन कार्य करतांना त्रास होऊ शकतो

ऑनलाईन अर्ज भरताना महत्वाच्या सूचना

  1. जाहिरात व्यवस्थित वाचणे
  2. ज्या पाठयक्रमासाठी अर्ज करणार आहात त्या पाठयक्रमाच्या अटी व शर्ती व्यवस्थित तपासून घेणे.
  3. फॉर्म भरण्याआधी User ID व Password तयार करणे व फॉर्म भरताना व पुढील कोणतीही प्रक्रिया करताना त्याचा वापर करणे.
  4. अंतिम दिनांकाच्या अगोदर पूर्ण अर्ज शुल्कासह भरणे. भरलेले शुल्क परत केले जाणार नाही
  5. आपण तयार केलेले User ID व Password ने नमूद केलल्या संकेस्थळावर प्रवेशासाठी अर्ज ( Fill Application Form) या शीर्षकाखाली फॉर्म पूर्णपणे भरुन झाल्यावर त्याची प्रिंट काढून स्वतःकडे एक प्रिंट ठेवणे (सदर अर्जाची प्रिंट शेक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी बघितली जाईल) अर्ज भरताना खालील नमूद केलेली माहिती योग्य रितीने भरणे.
  6. अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात बघावी
  1.  स्वतःबददल पूर्ण माहिती (Personal Information) ब. शैक्षणिक माहिती (Educational Details)
  2. वैदयकीय माहिती (Medical Information )
  3. इतर माहिती (Other Information)
  4. ईमेल आयडी
  5. मोबाईल नं.





परिक्षा फी : 

वर्ग अग्निशामक पाठयक्रम उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम
खुला रु.५००/- रु.६००/-
राखीव (अनु.जाती/जमाती/विमुक्त जाती व भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग/एसईबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्ग) रु.४००/- रु.४५०/-
  1.  परीक्षा शुल्काचा भरणा हा फक्त Online पध्दतीनेच करावयाचा आहे. या नमूद केल्याप्रमाणे Online पध्दती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पध्दतीने भरणा केलेले परीक्षा शुल्क हे विचारात घेतले जाणार नाही.
  2. उमेदवाराने दोन्ही पाठयक्रमासाठी अर्ज केला असल्यास विहित केल्याप्रमाणे प्रत्येक पाठयक्रमासाठी त्याने परीक्षा शुल्क एकाच वेळी भरणे आवश्यक आहे.
  3. Online परीक्षा शुल्क भरण्याची पध्दती
  1. क्रेडिट कार्ड (Credit Card)
  2. डेबिट कार्ड ( Debit Card)
  3. इंटरनेट बँकींग (Internet Banking)
  4. युपीआय भिम ( UPI Bhim)




महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 10/06/2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31/07/2022

 

मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top