वन विभागा भरती निवड पद्धत | Van Vibhag Accountant Bharti 2023 Selection Process

Van Vibhag Accountant Bharti 2023 Selection Process:

निवडीची पध्दत:

  • ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ व शासनाच्या अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट-२ म्हणून जोडले आहे.



ऑनलाईन परीक्षा :-

  • ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.
अ.क्र  विषय  गुण 
1 मराठी  50
2 इंग्रजी  50
3 सामान्य ज्ञान  50
4 बौद्धिक चाचणी  50



  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील. ७.१.३ परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल. ७.१.४ परीक्षा ही २ तासाची राहील.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.

ऑनलाईन परीक्षेचा निकाल :-

  • वनवृत्तनिहाय ऑनलाईन परीक्षेचा निकाल वेबसाईटवर प्रसिद करण्यात येईल. उमेदवाराने ज्या बनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच बनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल.

कागदपत्र तपासणी :- 

ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवाराची प्रादेशिक निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्राची तपासणी करण्यात येईल. कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-३ प्रमाणे), जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.


निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे :-
  • ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने वनवृत्तवार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती वेबसाईटवर दर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील तरतुदीनुसार तयार करण्यात येईल.
निवड यादीची कालमर्यादा :-
  • प्रादेशिक निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, त्यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधीग्राह्य राहील. त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल.
  • प्रादेशिक निवड समितीने तयार केलेल्या निवडसूचीमधून ज्येष्ठतेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहीत मुदतीत रुजू न झाल्यास किंदा संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार किया जात प्रमाणपत्र / अन्य आवश्यक प्रमाणपत्राची अनुपलब्धता / अवधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर नजिकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास अशी पदे त्या च्या प्रवर्गाच्या निवडसूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून (प्रतिक्षायादीतील) वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतील. मात्र, अशी कार्यवाही निवडसूचीच्या कालमर्यादेत करण्यात येईल.



error: Content is protected !!