Agnipath Yojana 2022 : भारतीय सैन्याने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भर्ती रॅली 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. अग्निवीर भरती रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणी जुलैमध्ये सुरू होणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सैन्यात अग्निवीर होण्यासाठी उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अग्निवीर म्हणून भरती व्हायचं असेल तर कोणत्या प्रकारची आणि कशी Physical Test द्यावी लागेल याबद्दलची माहिती देणार आहोत. जाणून घेऊया सविस्तर…
Indian Army Agniveer Bharti 2023: शारीरिक पात्रता
पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
1 | अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] | 168 | – | 77/82 |
2 | अग्निवीर (टेक्निकल) | 167 | – | 76/81 |
3 | अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 162 | – | 77/82 |
4 | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) | 168 | – | 76/81 |
5 | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) | 168 | – | 76/81 |
धावणे – ( Agnipath Yojana 2022)
- 1.6 किलोमीटर धावणं आवश्यक असेल.
- गट। – 5 मिनिटे 30 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 60 गुण मिळणार
- गट ॥ – 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 48 गुण मिळणार
बीम ( पुल अप) आणि गुण तपशील | ||
अ. क्र. | बीम ( पुल अप) – | गुण |
1 | 10 बीम पुल अप केल्यास – | 40 गुण मिळणार |
2 | 9 बीम पुल अप केल्यास | 33 गुण मिळणार |
3 | 8 बीम पुल अप केल्यास | 27 गुण मिळणार |
4 | 7 बीम पुल अप केल्यास | 21 गुण मिळणार |
5 | 6 बीम पुल अप केल्यास | 16 गुण मिळणार |
लांब उंडी :
- उमेदवारांना 9 फूट लांब उडी आणि झिगझॅग बॅलन्सिंगसह धावणे आवश्यक आहे. तसंच इतरही काही टेस्ट घेण्यात येणार आहेत.
वैद्यकीय चाचणी :
रॅलीच्या ठिकाणी विहित वैद्यकीय मानकांनुसार (Agnipath Yojana) वैद्यकीय चाचणी होईल. अपात्र आढळलेल्या उमेदवारांना तज्ज्ञांच्या पडताळणीसाठी लष्करी रुग्णालयात पाठवले जाईल. उमेदवारांना रेफरलच्या पाच दिवसांच्या आत संबंधित लष्करी रुग्णालयात अहवाल द्यावा लागेल आणि 14 दिवसांच्या आत रुग्णालयाद्वारे पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी केली जाईल.
पद आणि वय मर्यादा:
1. Agniveer (General Duty) (All Arms) – 171½ 23 वर्षे
2. Agniveer (Tech) – 17 ½ – 23 वर्षे
3. Agniveer Tech (Aviation & Ammunition Examiner) – 17 ½ – 23 वर्षे वर्षे
4. Agniveer Clerk / Store Keeper Technical (All Arms) – 17 ½- 23
5. Agniveer Tradesmen (All Arms) (10th pass) – 17½- 23 वर्षे
6. Agniveer Tradesmen (All Arms) (8th pass) – 17½ – 23 वर्षे