Deendayal Port Authority Recruitment 2026 अंतर्गत Marine Department मध्ये Marine Helper (Survey) आणि Marine Helper (Flotilla) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 16 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना दरमहा ₹30,000 निश्चित वेतन मिळणार आहे.
या भरतीसाठी किमान 7 वी उत्तीर्ण असणे, पोहता येणे आणि संबंधित पदासाठी आवश्यक अनुभव असणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून विहित अर्ज नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा.
Deendayal Port Authority Recruitment 2026
एकूण जागा : 16 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पदाचे नाव | जागा | UR | SC | ST | OBC (NCL) |
|---|---|---|---|---|---|
| Marine Helper (Survey) | 4 | 3 | 0 | 0 | 1 |
| Marine Helper (Flotilla) | 12 | 8 | 1 | 0 | 3 |
| एकूण | 16 | 11 | 1 | 0 | 4 |
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
1. Marine Helper (Survey)
- किमान 7 वी उत्तीर्ण.
- पोहता येणे अनिवार्य.
- Marine क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
- अनुभवाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक.
2. Marine Helper (Flotilla) – 12 जागा
- किमान 7 वी उत्तीर्ण.
- पोहता येणे अनिवार्य.
- Housekeeping, Sanitation, Cleaning किंवा स्वच्छतागृहांच्या देखभाल क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
- Marine किंवा Industrial Environment मधील अनुभवास प्राधान्य.
- अनुभवाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक.
वयोमर्यादा | Age Limit :
या भरतीसाठी 1 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 25 वर्षे असावे.
| प्रवर्ग | कमाल वयोमर्यादेतील सवलत |
|---|---|
| खुला प्रवर्ग (UR) | 25 वर्षे |
| SC/ST | 5 वर्षे |
| OBC (NCL) | 3 वर्षे |
पगार | Salary :
| पदाचे नाव | मासिक वेतन |
|---|---|
| Marine Helper (Survey) | ₹30,000 |
| Marine Helper (Flotilla) | ₹30,000 |
नोकरीचा कालावधी
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला तीन वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी केली जाईल. जाहिरातीनुसार, प्रत्येक 11 महिन्यांनंतर एक दिवसाचा खंड ठेवून पुढील मुदतवाढीची तरतूद आहे. ही मुदतवाढ समाधानकारक कामगिरीच्या अधीन असेल.
ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी नसून कंत्राटी नियुक्ती आहे.
निवड प्रक्रिया | Selection Process :
या भरतीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
- शैक्षणिक पात्रता, वय आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांची प्राथमिक छाननी केली जाईल.
- पात्र उमेदवारांना Swimming Test साठी बोलावले जाईल.
- पोहण्याची चाचणी संबंधित प्राधिकरणाच्या निर्धारित नियमांनुसार घेतली जाईल.
- Swimming Test आणि निर्धारित निकषांनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- निवड व मुलाखतीसंबंधी माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
अर्ज पाठवण्यापूर्वी सर्व पात्रता निकष पूर्ण असल्याची खात्री करावी.
आवश्यक कागदपत्रे | Important Documents :
अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित (Self-attested) प्रती जोडाव्यात:
- 7 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- जन्मतारीख किंवा वयाचा पुरावा.
- संबंधित पदासाठी किमान एक वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र.
- SC/ST/OBC (NCL) प्रवर्गातील उमेदवारांसाठी वैध जात प्रमाणपत्र.
- आधार कार्ड, PAN कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची प्रत.
- विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज.
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो.
अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून सर्व कागदपत्रे जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार जोडावीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
The Dy. Conservator,
Deendayal Port Authority,
Administrative Office Building,
Room No. 211, Post Box No. 50,
Gandhidham, Kutch, Gujarat – 370201.
महत्त्वाची सूचना: Marine Helper (Survey) आणि Marine Helper (Flotilla) या दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास स्वतंत्र अर्ज भरणे आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी एकाच अर्जात अर्ज केल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
अपूर्ण अर्ज, आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जाऊ शकतात. पोस्टाच्या विलंबाची जबाबदारी प्राधिकरणाची राहणार नाही.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
| तपशील | तारीख |
|---|---|
| जाहिरात दिनांक | 23 ऑक्टोबर 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 13 नोव्हेंबर 2026 |
| Swimming Test / मुलाखत | अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल |
| अंतिम निकाल | अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल |
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links) :
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा