Income Tax Department Bharti 2026

Income Tax Department Bharti 2026: 10वी पासवर कोणतीही लेखी परीक्षा न देता Income Tax मध्ये सरकारी नोकरी मिळणार

Income Tax Department Sports Quota Bharti 2026: आयकर विभागात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या Meritorious Sportspersons म्हणजेच उत्कृष्ट क्रीडा कामगिरी केलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Principal Chief Commissioner of Income Tax, West Bengal & Sikkim Region यांच्या कार्यालयामार्फत Tax Assistant (TA) आणि Multi-Tasking Staff (MTS) पदांच्या एकूण 82 रिक्त जागांसाठी Sports Quota Recruitment 2026 जाहीर करण्यात आली आहे. अर्जाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 आहे.




Income Tax Department Sports Quota Recruitment 2026

एकूण जागा : 82 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

क्र.पदाचे नावरिक्त पदेPay Levelवेतनश्रेणी
1Tax Assistant (TA)25Level-4₹25,500 – ₹81,100
2Multi-Tasking Staff (MTS)57Level-1₹18,000 – ₹56,900
एकूण82 जागा




शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

Tax Assistant (TA):

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची Degree किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

Multi-Tasking Staff (MTS):

  • मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण (Matriculation) किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता 1 जुलै 2026 पर्यंत प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. त्यानंतर मिळवलेली पात्रता या भरतीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

कोणत्या खेळाडूंना अर्ज करता येईल? | Sports Eligibility

ही सामान्य सरकारी भरती नसून Meritorious Sportsperson Recruitment आहे. जाहिरातीनुसार National/International स्तरावरील प्रतिनिधित्व, Junior National Championship मधील पदक, Khelo India Youth Games, Khelo India Winter Games, Khelo India Para Games, Khelo India University Games तसेच School Games Federation of India मधील पात्र कामगिरी विचारात घेतली जाते.

Chess साठी Grand Master (GM), International Master (IM) Title आणि Chess Olympiad यांसारख्या कामगिरीचाही जाहिरातीत समावेश आहे.

वयोमर्यादा | Age Limit

वयाची गणना 01 जुलै 2026 रोजी केली जाणार आहे.

पदवयोमर्यादा
Tax Assistant18 ते 27 वर्षे
MTS18 ते 25 वर्षे




निवड प्रक्रिया कशी असेल? | Selection Process

उमेदवारांची निवड खालील प्रक्रियेतून केली जाणार आहे:

Application Scrutiny → Shortlisting → Document Verification → Ground/Field Proficiency Test → Final Merit

Shortlisted उमेदवारांना त्यांच्या क्रीडा प्रकारातील Ground/Field Proficiency Test साठी बोलावले जाईल.

तसेच Tax Assistant (TA) पदासाठी shortlisted उमेदवारांना Data Entry Skill Test @ 8000 key depressions per hour उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. अंतिम निवड क्रीडा कामगिरी आणि Ground/Field Proficiency Test मधील गुणांच्या आधारे Order of Merit नुसार केली जाईल.

निवडीत कोणाला प्राधान्य? | Selection Preference

सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. त्यानंतर National Championship/National Games मधील पात्र कामगिरी, Inter-University/Khelo India University Games, Khelo India Youth/Winter/Para Games आणि School Games या क्रमाने प्राधान्य दिले जाते




अर्ज कसा करायचा? | How to Apply

या भरतीसाठी Offline Application करायचा आहे.

उमेदवाराने ANNEXURE-A मधील निर्धारित अर्ज भरून खालील कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्ट/कुरिअरद्वारे पाठवायचा आहे:

Joint Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment),
1st Floor, Room No-14, Aayakar Bhawan,
P-7, Chowringhee Square, Kolkata – 700069

अर्ज Normal Post / Speed Post / Registered Post / Courier द्वारे पाठवता येईल आणि तो 30 सप्टेंबर 2026 पर्यंत कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. अर्ज जमा करण्यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक नाही.

Google Form देखील भरावा लागेल का?

होय. जाहिरातीनुसार physical application सोबत उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात Google Form मध्ये आवश्यक माहिती भरण्यास सांगितले आहे.

मात्र Google Form हा physical application च्या पर्यायाऐवजी अतिरिक्त requirement आहे. Google Form आणि physical application मध्ये काही विसंगती असल्यास physical application मधील माहिती अंतिम मानली जाईल.

महत्त्वाचे: Google Form भरला तरी निर्धारित physical application पाठवणे आवश्यक आहे.

मुळ जाहिरात (Official Notification)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) इथे क्लिक करा

Documents Required – आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या attested photocopies जोडाव्या लागतील. यामध्ये मुख्यतः:

  • Application Form – Annexure-A
  • Aadhaar Card / Voter ID / PAN / Driving Licence / Passport
  • Address Proof
  • Birth Certificate
  • 10वी Marksheet & Certificate
  • 12वी Marksheet & Certificate, लागू असल्यास
  • Graduation Marksheet & Certificate, TA साठी
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • Caste Certificate, लागू असल्यास
  • PwBD Certificate, लागू असल्यास
  • Sports Achievement Certificates
  • Annexure-B Declaration
  • Annexure-C Certificate, लागू असल्यास
  • Annexure-D मधील संबंधित Sports Certificate Forms




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top