MPSC Bailiff Clerk Exam Date 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ-क्लार्क, गट-क स्पर्धा परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केली असून ही परीक्षा रविवार, 06 सप्टेंबर 2026 रोजी ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. ही माहिती आयोगाने 05 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
MPSC Bailiff Clerk Exam Date 2026:
परीक्षा कधी होणार?
- परीक्षेचे नाव: मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ-क्लार्क, गट-क स्पर्धा परीक्षा 2026
- परीक्षेची तारीख: 06 सप्टेंबर 2026 (रविवार)
- परीक्षा पद्धत: ऑफलाइन
परीक्षा केंद्र
परीक्षा खालील जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.
- अमरावती
- छत्रपती संभाजीनगर
- नागपूर
- नाशिक
- नवी मुंबई
- पुणे
परीक्षा वेळापत्रक
| पेपर | वेळ |
|---|---|
| पेपर 1 | सकाळी 11:00 ते 12:00 |
| पेपर 2 | दुपारी 3:00 ते 4:00 |
प्रवेशपत्र कधी मिळणार?
आयोगाच्या माहितीनुसार पात्र उमेदवारांचे Admission Certificate (Hall Ticket) परीक्षेपूर्वी अंदाजे 07 दिवस आधी उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिले जातील. उमेदवारांनी नियमितपणे MPSC प्रोफाइल तपासत राहावे.
महत्त्वाच्या सूचना
- परीक्षा निश्चित तारखेलाच आयोजित केली जाईल.
- अर्जामधील कायमस्वरूपी/पत्रव्यवहाराच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येईल.
- प्रवेशपत्र ऑनलाइन डाउनलोड करावे.
- परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रासोबत वैध फोटो ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.
- मूळ जाहिरातीतील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अधिकृत प्रसिद्धीपत्रकाचा सारांश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या परीक्षेचे आयोजन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेच्या तयारीवर भर द्यावा आणि पुढील सर्व सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पाहाव्यात.
महत्त्वाच्या तारखा
| घटना | तारीख |
|---|---|
| जाहिरात प्रसिद्ध | 15 जून 2026 |
| प्रसिद्धीपत्रक | 05 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा | 06 सप्टेंबर 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या सुमारे 07 दिवस आधी |

