Beed District Court Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, बीड अंतर्गत सफाईगार (Sweeper) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. या भरतीमध्ये 7वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
Beed District Court Bharti 2026
एकूण जागा | Total Post : 2 जागा
पदाचे नाव | Post Name : सफाईगार
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
उमेदवाराने खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:
- भारताचा नागरिक असावा.
- किमान 7वी उत्तीर्ण असावा.
- शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
- मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता यायला हवी.
- शौचालय, स्नानगृह, कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा | Age Limit :
- खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे
- मागासवर्ग : 18 ते 43 वर्षे
- शासकीय कर्मचारी : नियमानुसार सवलत
निवड प्रक्रिया | Selection Process :
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.
- प्रात्यक्षिक परीक्षा – 30 गुण
- शारीरिक क्षमता चाचणी – 10 गुण
- वैयक्तिक मुलाखत – 10 गुण
एकूण गुण – 50
आवश्यक कागदपत्रे | Important Documents
- जन्माचा दाखला / SSC प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- रोजगार नोंदणी प्रमाणपत्र (असल्यास)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वयंघोषणापत्र
- चारित्र्य प्रमाणपत्र
- इतर आवश्यक कागदपत्रे
अर्ज फी | Application Fee :
- सर्व प्रवर्गासाठी अर्ज फी : ₹500/-
- शुल्क Postal Order किंवा Demand Draft द्वारे District and Sessions Court, Beed यांच्या नावाने भरावे. शुल्क परत मिळणार नाही.
महत्त्वाच्या तारखा | Important Date :
- जाहिरात प्रसिद्ध – 27 जुलै 2026
- अर्ज सुरू – 27 जुलै 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 10 ऑगस्ट 2026 (सायं. 6:00 वाजेपर्यंत)
अर्ज कसा करावा | How to Apply ?
- अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
- अर्ज अचूक भरून आवश्यक कागदपत्रे जोडा.
- ₹500 चा Postal Order किंवा Demand Draft जोडा.
- लिफाफ्यावर “सफाईगार पदासाठी अर्ज” असे स्पष्ट लिहा.
- अर्ज स्पीड पोस्ट द्वारे खालील पत्त्यावर पाठवा.
पत्ता :
प्रबंधक,
जिल्हा व सत्र न्यायालय,
नगर रोड, बीड – महाराष्ट्र
महत्त्वाच्या लिंक्स | Important Link
अधिकृत वेबसाईट: https://beed.dcourts.gov.in
अधिकृत जाहिरात PDF: येथे क्लिक करा
