Government Vidyaniketan Scholarship Maharashtra 2025-26: जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील शासकीय विद्यानिकेतन (Government Vidyaniketan) मधून १० वी उत्तीर्ण केली असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत (Directorate of Higher Education – DHE) अशा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘गव्हर्नमेंट विद्यानिकेतन स्कॉलरशिप’ दिली जाते.
पुढील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या लेखात आपण या स्कॉलरशिपसाठी पात्रता काय आहे? किती पैसे मिळतात? आणि अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.
Government Vidyaniketan Scholarship काय आहे? (Short Overview)
| स्कॉलरशिपचे नाव | गव्हर्नमेंट विद्यानिकेतन स्कॉलरशिप, महाराष्ट्र (Government Vidyaniketan Scholarship) |
| कोणामार्फत दिली जाते? | उच्च शिक्षण संचालनालय (DHE), महाराष्ट्र शासन |
| लाभार्थी | शासकीय विद्यानिकेतनमधून १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी |
| स्कॉलरशिपची रक्कम | ₹१०० प्रति महिना |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० जून २०२६ |
| अधिकृत वेबसाईट | MahaDBT Portal (mahadbt.maharashtra.gov.in) |
या स्कॉलरशिपसाठी पात्रता काय आहे? (Eligibility Criteria)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
-
राष्ट्रीयत्व आणि रहिवासी: अर्जदार हा भारतीय नागरिक असावा आणि त्याच्याकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) असावे.
-
शाळा: विद्यार्थ्याने आपले १० वी चे शिक्षण महाराष्ट्रातील शासकीय विद्यानिकेतन (Government Vidyaniketan) मधून पूर्ण केलेले असावे.
-
गुणांची टक्केवारी: विद्यार्थ्याला १० वी च्या बोर्ड परीक्षेत किमान ६०% गुण असणे अनिवार्य आहे.
-
पुढील शिक्षण: १० वी नंतर विद्यार्थी पुढील उच्च शिक्षण (Post-Matric Course) घेत असावा.
-
इतर अट: विद्यार्थी इतर कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या स्कॉलरशिपचा लाभ घेत नसावा. तसेच, महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतील.
विद्यानिकेतन स्कॉलरशिपचे फायदे (Benefits)
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणादरम्यान दरमहा ₹१०० (१०० रुपये प्रति महिना) इतकी आर्थिक मदत दिली जाते.
आवश्यक कागदपत्रे (Important Documents List)
MahaDBT पोर्टलवर अर्ज करताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे:
-
१० वी ची गुणपत्रिका (Class 10 Marksheet) आणि प्रमाणपत्र
-
विद्यानिकेतनचे हक्क प्रमाणपत्र (Entitlement Card from Vidhyaniketan)
-
सध्या शिकत असलेल्या कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate)
-
महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
-
जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) – आवश्यक असल्यास
ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online via MahaDBT)
या स्कॉलरशिपसाठी तुम्हाला MahaDBT च्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे:
-
सर्वात आधी महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटला (mahadbt.maharashtra.gov.in) भेट द्या.
-
जर तुम्ही नवीन युझर असाल, तर ‘New Applicant Registration’ वर क्लिक करून आपली माहिती भरा, मोबाईल आणि ईमेल व्हेरीफाय करून नोंदणी करा.
-
नोंदणी झाल्यावर तुमच्या युझरनेम (Username) आणि पासवर्डच्या मदतीने ‘Applicant Login’ करा.
-
लॉग इन केल्यानंतर प्रोफाइल पूर्ण भरा (वैयक्तिक माहिती, पत्ता, मागील शिक्षण इ.).
-
त्यानंतर Directorate of Higher Education (DHE) अंतर्गत ‘Government Vidyaniketan Scholarship’ निवडा.
-
अर्जात मागितलेली सर्व माहिती अचूक भरा आणि वर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
-
शेवटी फॉर्म तपासून Submit करा.
संपर्क आणि मदत (Contact Details)
जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली किंवा काही शंका असेल, तर तुम्ही खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता:
-
पत्ता: उच्च शिक्षण संचालनालय (DHE), महाराष्ट्र शासन, ४११, चौथा मजला, मंत्रालय एनेक्स, मॅडम कामा रोड, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००३२.
-
फोन नंबर: (०२२)-२२०२५३०१
mportant Links (महत्त्वाच्या लिंक्स)
| MahaDBT Official Website | येथे क्लिक करा |
| New Applicant Registration | येथे नोंदणी करा |
| Applicant Login Link | येथे लॉग इन करा |
| Detailed Scholarship Information | येथे माहिती पहा |


