पोलीस भरतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा | Police Bharti Update
Maharashtra Police Bharti Update: राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल 7,500 पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे.
औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. हा कार्यक्रम सुरू असताना संबंधित परिसरात काही तरुणांनी पोलिस भरती, पोलिस भरती, (Police Bharti) अशी घोषणाबाजी त्यांनी केली. हे ऐकून शिंदे त्यांनी राज्यात साडेसात हजार पोलिस कर्मचाऱ्यांची भरती घोषणा केली. तसेच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं
मुख्यमंत्र्यांनी या केल्या घोषणा
- राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार.
- शहरातील टी. व्ही. सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठ पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिली. तसेच शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 31, 2022
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here