IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण घेण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IOCL च्या मार्केटिंग डिव्हिजन, वेस्टर्न रिजन अंतर्गत ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी, ITI, डिप्लोमा, 12वी आणि पदवी उत्तीर्ण उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून संबंधित NAPS किंवा NATS पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
IOCL Apprentice Recruitment 2026
एकूण जागा : 335
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| अ.क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे |
|---|---|---|
| 1 | टेक्निशियन अप्रेंटिस | 99 |
| 2 | ट्रेड अप्रेंटिस (ITI) | 40 |
| 3 | ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 174 |
| 4 | डेटा एंट्री ऑपरेटर अप्रेंटिस | 22 |
| एकूण जागा | 335 | |
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
1. टेक्निशियन अप्रेंटिस:
- संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील मान्यताप्राप्त संस्थेचा नियमित तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा आवश्यक आहे. सामान्य, EWS आणि OBC-NCL उमेदवारांना किमान 50% गुण, तर आरक्षित जागांसाठी पात्र SC/ST/PwBD उमेदवारांना किमान 45% गुण आवश्यक आहेत.
2. ट्रेड अप्रेंटिस (ITI):
- संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून नियमित पूर्णवेळ दोन वर्षांचा ITI कोर्स आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. ग्रॅज्युएट अप्रेंटिस:
- BA, B.Com, B.Sc. किंवा BBA यांसारखी मान्यताप्राप्त विद्यापीठाची नियमित पूर्णवेळ पदवी आवश्यक आहे. सामान्य, EWS आणि OBC-NCL उमेदवारांसाठी किमान 50% गुण, तर आरक्षित जागांसाठी पात्र SC/ST/PwBD उमेदवारांसाठी किमान 45% गुण आवश्यक आहेत.
4. डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर):
- बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी पात्र नाहीत. गुणांची अट प्रवर्गानुसार लागू आहे.
5. डेटा एंट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेटधारक):
- बारावी उत्तीर्ण असण्यासोबत मान्यताप्राप्त संस्थेकडून ‘Domestic Data Entry Operator’ या कौशल्याचे एक वर्षापेक्षा कमी कालावधीचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
महत्त्वाचे: जाहिरातीनुसार संबंधित पात्रता नियमित पूर्णवेळ अभ्यासक्रमातून मिळवलेली असावी. अर्धवेळ, पत्रव्यवहार किंवा दूरस्थ शिक्षणातून मिळवलेली पात्रता स्वीकारली जाणार नाही.
वयोमर्यादा | Age Limit :
या भरतीसाठी उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2026 रोजी खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 24 वर्षे
- SC/ST उमेदवार: 5 वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सूट
- OBC-NCL उमेदवार: 3 वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सूट
- PwBD उमेदवार: जाहिरातीतील नियमांनुसार वयोमर्यादेत सूट
आरक्षण आणि वयातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करावी लागतील.
अर्ज फी | Application Fee :
- उपलब्ध अधिकृत जाहिरातीमध्ये अर्ज फी नमूद केलेली नाही.
निवड प्रक्रिया : Selection Process :
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या अप्रेंटिस भरती 2026 मध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय, शैक्षणिक गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या मेरिट लिस्टनुसार केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण करावी लागेल.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
-
जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: 5 ऑक्टोबर 2026
-
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 5 ऑक्टोबर 2026, सकाळी 10 वाजता
-
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 नोव्हेंबर 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
-
वय व शैक्षणिक पात्रतेसाठी कट-ऑफ तारीख: 30 सप्टेंबर 2026
- कागदपत्र पडताळणीची तारीख: निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल.
योग्य पोर्टलवर नोंदणी करा
-
ट्रेड अप्रेंटिस – ITI / डेटा एंट्री ऑपरेटर: येथे क्लिक करून नोंदणी करा
-
टेक्निशियन अप्रेंटिस – डिप्लोमा: येथे क्लिक करून नोंदणी करा
-
ग्रॅज्युएट अप्रेंटिस – पदवीधर: येथे क्लिक करून नोंदणी करा
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| NAPS पोर्टल – ITI / डेटा एंट्री ऑपरेटर | ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा |
| NATS पोर्टल – टेक्निशियन / ग्रॅज्युएट अप्रेंटिस | ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा