Mumbai High Court Bharti 2026: 4 थी पास उमेदवारांसाठी माळी/मदतनीस पदांची भरती | पगार ₹52,400 पर्यंत

Mumbai High Court Bharti 2026: मुंबई येथील मुंबई उच्च न्यायालय (मूळ शाखा) अंतर्गत माळी/मदतनीस (Mali/Helper) पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. केवळ 4 थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम सरकारी नोकरीची संधी असून निवड झालेल्या उमेदवारांना ₹16,600 ते ₹52,400 वेतनश्रेणी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2026 पूर्वी स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवावा.




Mumbai High Court Bharti 2026 Overview

भरती संस्था : मुंबई उच्च न्यायालय (मूळ शाखा)

पदाचे नाव : माळी / मदतनीस

एकूण जागा :

  • एकूण पदे: 02
  • निवड यादी: 03
  • प्रतीक्षा यादी: 01

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:

  • किमान 4 थी उत्तीर्ण
  • मराठी भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक
  • बगीचे, झाडे, हिरवळ यांची देखभाल करण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव




वयोमर्यादा :

प्रवर्ग वयोमर्यादा
खुला 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे
शासकीय कर्मचारी नियमानुसार




अर्ज फी :

सर्व प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क:

  • ₹1,000/-
  • “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” यांच्या नावे Demand Draft

पगार : 

  • वेतन स्तर: S-3 (₹16,600 – ₹52,400 + महागाई भत्ता व इतर भत्ते)

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:

टप्पा गुण
प्रात्यक्षिक परीक्षा 30
शारीरिक क्षमता चाचणी 10
वैयक्तिक मुलाखत 10
एकूण 50

प्रात्यक्षिक परीक्षेत किमान 15 गुण आवश्यक आहेत.

आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती जोडाव्यात.

  • जन्माचा पुरावा
  • 4 थी किंवा इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • 3 वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र
  • चारित्र्य प्रमाणपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अधिवास प्रमाणपत्र
  • रोजगार नोंदणी प्रमाणपत्र (असल्यास)
  • NOC (शासकीय कर्मचारी असल्यास)
  • विवाहानंतर नाव बदलल्याचा पुरावा (लागू असल्यास)
  • ₹1,000 चा Demand Draft




अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत नमुन्यात अर्ज भरावा.
  2. सर्व माहिती अचूक भरावी.
  3. आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  4. ₹1,000 चा Demand Draft जोडावा.
  5. अर्ज स्पीड पोस्टने खालील पत्त्यावर पाठवावा.

पत्ता:

प्रबंधक, मूळ शाखा,
मुंबई उच्च न्यायालय,
वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला,
P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई – 400032

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज फक्त स्पीड पोस्टने स्वीकारले जातील.
  • अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 2 वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी असेल.
  • निवड गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा :

कार्यक्रम तारीख
जाहिरात प्रसिद्ध 01 ऑगस्ट 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2026

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
अर्ज (Application Form) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!