4 वर्षांनंतर नोकरीची चिंता संपली? माजी अग्निवीरांसाठी 1000 पदांचा मोठा निर्णय | Maharashtra Government Jobs for Ex-Agniveers

Maharashtra Government Jobs for Ex-Agniveers: महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सैन्यदलात चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये गणवेशधारी गट-क संवर्गात पुनर्नियुक्ती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 27 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार माजी अग्निवीरांसाठी विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये 1000 अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.




Maharashtra Government Jobs for Ex-Agniveers

 

माजी अग्निवीरांसाठी कोणत्या विभागात संधी मिळू शकते?

विभाग आस्थापना संभाव्य पद
गृह विभाग पोलीस महासंचालक / राज्य पोलीस दल / राज्य राखीव पोलीस दल पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई
गृह विभाग महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा कारागृह पोलीस/रक्षक
गृह विभाग नागरी संरक्षण संचालनालय अग्निशामक / बचावकर्ता
गृह विभाग महासंचालक, गृह रक्षक दल हवालदार निदेशक/कनिष्ठ निदेशक/प्रात्यक्षिक निदेशक
राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान, जवान व वाहन चालक
वन विभाग प्रधान मुख्य वन संरक्षक वन रक्षक
नगर विकास विभाग महानगरपालिका / नगरपालिका अग्निशामक विमोचक / अग्निशामक




1000 पदांना मंजुरी

महाराष्ट्र शासनाने माजी अग्निवीरांना त्यांच्या सैन्यसेवेतील प्रशिक्षण, कौशल्य आणि शारीरिक क्षमतेचा योग्य वापर करून देण्यासाठी शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्याच्या उद्देशाने 1000 अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे.

ही पदे विविध विभाग आणि संवर्गानुसार निश्चित करण्याची जबाबदारी उच्चस्तरीय सचिव समितीवर सोपवण्यात आली आहे.

माजी अग्निवीरांसाठी समितीची स्थापना

या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये गृह, वन, सामान्य प्रशासन, वित्त, नगर विकास तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य आहेत.

समितीची प्रमुख कामे

समितीला मुख्यतः पुढील जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:

  1. माजी अग्निवीरांसाठी विभाग व संवर्गनिहाय अधिसंख्य पदे निश्चित करणे.
  2. या पदांवर नियुक्ती करण्याची कार्यपद्धती ठरवणे.
  3. अधिसंख्य पदावर नियुक्त झालेल्या माजी अग्निवीरांना पुढे नियमित शासकीय/निमशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कार्यपद्धती सुचवणे.

नियुक्ती प्रक्रिया कशी असेल?

सध्या शासन निर्णयामध्ये माजी अग्निवीरांच्या नियुक्तीसाठी अंतिम अर्ज प्रक्रिया, परीक्षा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता किंवा विभागनिहाय पदसंख्या जाहीर करण्यात आलेली नाही.

उच्चस्तरीय समिती विभाग व संवर्गनिहाय पदे आणि नियुक्तीची कार्यपद्धती निश्चित करणार आहे. त्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागांकडून अधिसंख्य पदनिर्मितीचे आदेश जारी केले जातील.

त्यामुळे माजी अग्निवीरांनी अधिकृत भरती जाहिरात/नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे.




हा निर्णय माजी अग्निवीरांसाठी का महत्त्वाचा आहे?

अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यदलात चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर कामगिरी, शिस्त आणि कौशल्याच्या आधारे 25% अग्निवीरांना कायमस्वरूपी सैन्य सेवेत नियुक्त केले जाते, तर उर्वरित 75% अग्निवीर सेवामुक्त होतात.

सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांना त्यांच्या सैन्यसेवेतील प्रशिक्षणाचा उपयोग करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.

शासन निर्णयाची तारीख व क्रमांक

  • विभाग: सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण 2026/प्र.क्र.205/मासैक
  • दिनांक: 27 ऑगस्ट 2026
  • ठिकाण: मंत्रालय, मुंबई
  • निर्णयाचा संकेतांक: 202608271919474207




Important Links

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!