RTE Lottery Result 2025-26

RTE Lottery Result 2025-26 | आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, | प्रवेशप्रक्रिया “या” तारखेपर्यंत

RTE Lottery Result 2025-26: आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीत निवडल्या गेलेल्या बालकांची यादी आज, शुक्रवारी जाहीर झाली आहे. आहे. त्यानंतर बालकांच्या पालकांना कागदपत्रे सादर करून 14 फेबुवारी 2025 ते 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.



RTE Admission 2025 Lottery Result In Marathi

  •  निवड यादीतील (List No. 1) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 14/02/2025 पासून 28/02/2025 पर्यंत राहील.
  • निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
  • आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी .
  • अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
  • प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
  • निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.
  • State Summary: Total Selection : 101916 and Total Waiting Selection : 85406




RTE Admission लॉटरीची यादी डाऊनलोड करण्यासाठी

image not found येथे क्लिक करा 

RTE Admission साठी लागणारी महत्वाचे कागदपत्रे 

  • आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. (उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही)
  • पत्त्याचा पुरावा – रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल इत्यादी.
  • आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक. (पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे)
  • विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला
  • विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.

RTE Admission साठी लागणारी महत्वाचे Document PDF डाऊनलोड करण्यासाठी

image not foundयेथे क्लिक करा



 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top