Pink Rickshaw Yojana Maharashtra

मुलींना व महिलांना पिंक ई-रिक्षा मिळणार; पाहा संपूर्ण माहिती | Pink Rickshaw Yojana Maharashtra | Auto E Rickshaw Yojana

Pink Rickshaw Yojana Maharashtra: मा. उपमुख्यमंत्री (वित्त), महाराष्ट्र राज्य यांनी सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात “पिंक ई-रिक्षा – १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. त्यानुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच, महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती




Pink Rickshaw Yojana Maharashtra

शासन निर्णय :-

राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच, महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देत आहे.

२. सदर योजनेंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजु महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) रिक्षा” उपलब्ध करुन देण्यासाठी खालीलप्रमाणे १०,००० लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

अ.क्र. शहर  लाभार्थी
1 मुंबई उपनगर 1400
2 ठाणे 1000
3 पुणे 1400
4 नाशिक 700
5 नागपूर 1400
6 कल्याण 400
7 अहमदनगर 400
8 नवी मुंबई 500
9 पिंपरी 300
10 अमरावती 300
11 चिंचवड 300
12 पनवेल 300
13 छत्रपती संभाजीनगर 400
14 डोंबिवली 400
15 वसई-विरार 400
16 कोल्हापूर 200
17 सोलापूर 200
एकूण  जागा  10,000





योजनेचे स्वरुपः-

सदर योजनेंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

  1. ई-रिक्षाची किंमतीमध्ये सर्व करांच्या (GST, Registration, Road Tax, etc.) समावेश असेल.
  2. नागरी सहकारी बैंका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंका/राष्ट्रीयकृत बँका / अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
  3. राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलेल.
  4. योजनेची लाभार्थी महिला/मुलीं यांच्यावर १० टक्के आर्थिकभार असेल.
  5. कर्जाची परतफेड ५ वर्षे (६० महिने)

योजनेचे लाभार्थी:-

  • राज्यातील गरजू मुली व महिला.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रताः-

  1. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
  2. अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
  3. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे.
  4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.३.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
  5. लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील.
  6. विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह/बालगृहातील आजी/माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.
  7. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुध्दा प्राधान्य देण्यात येईल.




सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-

  1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड.
  3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.
  4. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.३.०० लाखापेक्षा कमी.).
  5. बैंक खाते पासबुक.
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  7. मतदार ओळखपत्र (१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला).
  8. रेशनकार्ड
  9. चालक परवाना (Driving License).
  10. सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र,
  11. सदर योजनेच्या अटीशर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

अधिक माहितीसाठी  व GR पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top