Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Document List

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | ही ४ कागदपत्रे असतील तरच फॉर्म भरता येणार | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Document List

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महाराष्ट्रात ‘माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत, महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल. यासाठी शासकीय कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात आघाडी सरकारने ही योजना जाहीर केली होती, ज्याअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांनी अर्ज करण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयात पोहोचण्यास सुरुवात केली आहे. या योजनेसाठी महिलांची प्रचंड गर्दी असल्याने अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत.



Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Document List:

आधार कार्ड :

काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. ओळखीचा पुरावा (यामध्ये तुमचे नाव व फोटो समाविष्ट गरजेचे आहे)
  2. पत्त्याचा पुरावा (यामध्ये तुमचे नाव आणि पत्ता असणे गरजेचे आहे)
  3. जन्मतारखेचा पुरावा
  4. नातेसंबंधाच्या कागदपत्राचा पुरावा (घरातील मुख्य व्यक्तीसंदर्भातील माहिती यामध्ये समाविष्ट असावी)

आधारकार्ड काढताना ह्या कागदपत्रांची मुळप्रत तुम्हाला द्यावी लागते व ही कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला परत दिली जातात.

उत्पन्न दाखला (१ ते ३) :

काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. तलाठी उत्पन्न दाखला
  2.  शेती असल्यास ७ / १२ व ८ अ
  3. नोकरी असल्यास फार्म नं. १६
  4. पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स
  5. रेशन कार्ड झेरॉक्स
  6. आधार कार्ड झेरॉक्स
  7. फोटो

डोमासाईल नॅशनॅलिटी : 

काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. तलाठी रहिवाशी दाखला
  3. रेशन कार्ड झेरॉक्स
  4. आधार कार्ड
  5. फोटो





बँक पासबुक : 

काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

ओळखीचा पुरावा (पुढीलपैकी कोणतेही एक) :

  1. पासपोर्ट
  2. पॅनकार्ड
  3. मतदार ओळख पत्र
  4. चालक परवाना
  5. एनआरईजीए द्वारे जारी करण्यात आलेले जॉब कार्ड ज्याद्वारे राज्य सरकारच्या एका अधिकार्याने स्वाक्षरी केली आहे
  6. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने जारी केलेले पत्र ज्यामध्ये नाव, पत्ता आणि आधार क्रमांक समाविष्ट आहे
  7. ओळखपत्र (बँकेच्या समाधानाच्या बाबीनुसार)
  8. मान्यतेसाठी ग्राहकाची ओळख आणि निवासाची पडताळणी एका मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाचे पत्र किंवा सरकारी नोकर
रेशन कार्ड :
नवीन रेशनकार्डसाठी आवश्यक कागदपत्रे –
  • नाव कमी केल्याचा तहसीलदार यांचा दाखला. हा दाखला दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती असल्यास आवश्यक असतो
  • नाव कमी केल्याचा तलाठ्याचा दाखला. हा दाखला दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती असल्यास आवश्यक असतो
  • सरपंच रहिवासी दाखला ग्रामीण भागासाठी
  • नगरसेवकाचा रहिवासी दाखला शहरी भागासाठी
  • तलाठ्याकडील रहिवासी दाखला
  • तलाठ्यांचा उत्पन्नाचा दाखला
  • ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला
  • मिळकतीबाबत घराचा ८अ चा उतारा/वीजबिल
  • भाड्याने राहात असेल तर घरमालकाचे संमतीपत्र प्रतिज्ञापत्र, को-या कागदावर पाच रुपयांचे कोर्ट फी स्टॅपसह
  • नवीन कार्ड मिळण्यासाठी स्वतःचे प्रतिज्ञापत्र कोऱ्या कागदावर पाच रुपयांच्या कोर्ट फी स्टॅपसह
  • विहित नमुन्यातील अर्ज पाच रुपयांच्या स्टॅपसह
  • लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला व इतर पुरावे कार्डधारकाच्या मागणीप्रमाणे.
  • पुस्तिकाची सत्यप्रत कोरल बँकिंग / राष्ट्रीयीकृत बँकेतील पती-पत्नी यांच्या संयुक्त बँक खात्याचा क्रमांक दर्शविणारे
  • बँकेच्या पासबुकाची सत्यप्रत
  • रेशनकार्ड धारकाचे दोन फोटो.

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक | These documents are required to apply

आधार कार्ड, अधिवास\जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बॅंक पासबुक आणि यासोबतच अर्जदाराचे फोटोही आवश्यक आहे.

भरलेला अर्ज कुठे जमा करायचा, जाणून घ्या 

अर्जदाराने संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे. सेतू सुविधा केंद्रावरही आपण अर्ज जमा करू शकता. राज्यभरातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रांवर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळतंय. उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठीही मोेठ्या रांगा लागल्याचे बघायला मिळतंय. योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, आधार अपडेट्ससाठीचे सर्व्हर स्लो झाल्याचे देखील अनेक ठिकाणी बघायला मिळतंय.




अर्ज कसा करायचा, जाणून घ्या प्रक्रिया |Ladki Bahini Yojana Online Apply

  • अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जातील
  • पात्र महिलांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज मंजूर झाल्यावर आधार लिंक केलेल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत केली जाईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज & हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा 




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top