Maza Ladka Bhau Yojana Maharashtra

लाडक्या भावांना महिन्याला 10 हजार रु. मिळणार | Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra : राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये १२ वी पास, विविध ट्रेड मधील आय.टी.आय., पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम” ही योजना दि.३ डिसेंबर, १९७४ पासून राबविण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरीता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

योजेनचे नाव : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजन 

सदर योजनेकरीता उमेदवाराची पात्रता खालिलप्रमाणे असेल :

  1. उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
  2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका / पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
  3. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  4. उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
  5. उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे.
  6. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
सदर योजनेकरीता आस्थापना /उद्योगासाठीची पात्रता खालिलप्रमाणे असेल :-

  1. आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
  2. आस्थापना / उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
  3. आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
  4. आस्थापना /उद्योगांनी EPF, ESIC, GST,Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधार ची नोंदणी केलेली असावी.
शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत एवढे विद्यावेतन मिळेल :
अ. क्र  शैक्षणिक अहर्ता  प्रतिमाह विद्यावेतन रु.
1 १२ वी पास रु. ६,०००/-
2 आय.टी.आय/ पदविका रु. ८,०००/-
3 पदवीधर / पदव्युत्तर रु. १०,०००/-
ladka bhau yojana maharashtra online apply

या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. 

GR पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top