Abdul Kalam Yojana 2023: मित्रांनो आज आपण या लेखात डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझाद व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजने बद्दल माहिती जाणून घेणार आहे. हि योजना १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आहे. जर तुम्ही दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात आपण या योजनेसाठी लागणारी पात्रता, नियम व अटी, किती मिळेल आर्थिक मदत?, कागदपत्रे कोणती लागतील या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
Abdul Kalam Yojana 2023
पुणे महानगरपालिकेची १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजना फक्त पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठीच आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनांतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते. विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा. सोबत आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करावीत. ०९/१०/२०२३ ते दि. २९/१२/२०२३. पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
काय आहे योजना? किती मिळणार मदत?
दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयांची मदत करणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना आहे.
योजनेसाठीची पात्रता | Scheme Qualification
- योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
- या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण असणे आवश्यक.
- पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण असणे आवश्यक.
- योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक.
- योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
नियम व अटी
- रेशनिंग कार्डची पहिले व शेवटचे पान अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
- कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती/ भाडे करारनामा यांपैकी आवश्यक.
- अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक.
- वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
- मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला आवश्यक राहील.
- बोर्ड मार्कशीट तसेच CBSE & ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. इयत्ता १० वी इयत्त १२ वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशालेत शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्याना ६५% तसेच कचरा वेचक / बायोगॅस प्रकल्पावर काम करणारा / कचऱ्याशी संबंधित काम करणारा असंघटीत कष्टकरी कामगार यांचे पाल्यास ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतील.
- महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरून स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करावेत.
- दिनांक ०९/०५/२००९ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
- इयत्ता १० वी इयत्ता १२ वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.
- पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा इयत्ता १० वी कमाल रक्कम रु. १५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल व इयत्ता १२ वी कमाल रक्कम रु.२५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
- मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करावेत..
- उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करून अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील..
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी, कृपया 18001030222 ( टोल फ्री क्रमांक) वर कॉल करा
रोज नवीन Update WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा