Mumbai Police Shipai Bharti Update

Mumbai Police Shipai Bharti Update: मुंबई पोलीस शिपाई भरती; ‘या’ तारखेला मैदानी चाचणी पुन्हा होणार; येथे पाहा संपूर्ण माहिती

Mumbai Police Shipai Bharti Update: मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या प्रक्रियेतील पहिला टप्या शारीरिक मोजमाप / मैदानी चाचणी दिनांक ०७/०२/२०२३ पासून सुरु करण्यात आली होती.  ज्या उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे एसएमएस / ई-मेल प्राप्त झालेले नाहीत अशा उमेदवारांसाठी पुन्हा मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.


Mumbai Police Shipai Bharti Update

मुंबई शहरातील नायगाव पोलीस मुख्यालय येथे महिला उमेदवार आणि मरोळ पोलीस मुख्यालय, मुंबई व मुंबई विदयापीठ, कलिना येथे पुरुष उमेदवार यांची शारीरिक मोजमाप / मैदानी चाचणी बाबत संबंधित उमेदवार यांना महा आयटी विभागाकडून एसएमएस आणि ई-मेल व्दारे कळविण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित उमेदवार महाराष्ट्र राज्य पोलीस भरती या पोर्टलवर युजर लॉग इन करून ओळखपत्रे प्राप्त करून घेवून भरती प्रक्रियेमध्ये उपस्थित रहात आहेत. मुंबई पोलीस शिपाई भरती. २०२१ च्या मैदानी शारीरिक मोजमाप/मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहणेबाबत महा-आपटी कडून ओळखपत्राबाबत एसएमएस आणि ई-मेल व्दारे कळविण्यात येते. ज्या उमेदवारांना महा-आयटी कडून तांत्रिक अडचणीमुळे एसएमएस / ई-मेल प्राप्त झालेले नाहीत अशा उमेदवारांना सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे दिनांक १५/०४/२०२३ व १६/०४/२०१३ रोजी मैदानी चाचणीसाठी संधी देण्यात येत आहे.सर्व संबंधितांच्या माहितीसाठी यादी सोबत जोडून प्रसिद्ध करण्यात येत आहे. पुरुष उमेदवारांनी सदर यादीमध्ये अर्ज क्रमांक नोंदवून तपासणी करावी, सदर यादीमध्ये अर्ज क्रमांकासमोरील नांव. चाचणीचा दिनांक/वेळ चाचणीसाठी उपस्थित राहणेबाबत मैदानाचे नांव व पत्ता तपासून पहावा व त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती या पोर्टलवर युजर लॉग इन करून ओळखपत्रे प्राप्त करुन घेवून भरती प्रक्रियेमध्ये उपस्थित रहावे नमूद दिनांक/वेळ मैदानावर संबंधित उमेदवार उपस्थित न राहील्यास त्यांना कोणत्याही कारणास्तव दिनांक बदलून मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

विशेष सूचना :- काही उमेदवारांना मेल/ मॅसेज न येता देखील त्यांनी हॉलटिकीट चेक करत राहून स्वतःची मैदानी चाचणी वेळेत दिलेली आहे. दिनांक १५/०४/२०२३ व १६/०४/२०२३ रोजी बोलविण्यात येणा-या उमेदवारांपैकी ज्यांनी आधिच मैदानी चाचणी दिलेली असेल, त्यांनी परत मैदानी चाचणीसाठी येऊ नये.

ज्या उमेदवारांना एसएमएस / ई-मेल प्राप्त झालेले नाहीत अशा उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👉उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top