Navi Mumbai Police Bharti Physical Result

Navi Mumbai Police Bharti Physical Result: नवी मुंबई पोलीस भरती शारीरिक निकाल जाहीर; फक्त हेच विद्यार्थी पोलीस भरती लेखी परीक्षा देऊ शकणार

Navi Mumbai Police Bharti Physical Result: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील २०४ रिक्त पदांकरिता पोलीस शिपाई भरती सन २०२१ ची मैदानी चाचणी दि.०२.०१.२०२३ ते दि.१३.०१.२०२३ या कालावधीत पोलीस परेड ग्राउंड, पोलीस मुख्यालय, कळंबोली, नवी मुंबई येथे पार पडली. प्रतिदिन घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचा निकाल वेळोवेळी नवी मुंबई पोलीस संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आला असुन मैदानी चाचणीचा एकत्रित तात्पुरता निकाल दि. २०/०१/२०२३ रोजी नवी मुंबई पोलीस संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या निकालाच्या अनुषंगाने उमेदवारांच्या मागविण्यात आलेल्या हरकती / आक्षेप यांचे निरसन करण्यात आलेले आहे.


👉नवी मुंबई पोलीस भरती शारीरिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 




महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व तदनंतर वेळोवेळी झालेल्या सुधारणांच्या अनुषंगाने शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण आहेत.

सदर तरतुदी प्रमाणे शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे गुणपत्रक आज दि. १७.०२.२०२३ रोजी नवी मुंबई पोलीस संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर गुणपत्रकातील उमेदवारांचे नांव, सामाजिक आरक्षण (Catagory), समांतर आरक्षण (Horizontal Reservation) जन्मतारीख (D.O.B.), शिक्षण (Education), गुण (Total Ground Marks) व N.C.C. इत्यादीबाबत काही आक्षेप / हरकती असतील त्या सविस्तरपणे दि. २१.०२.२०२३ रोजीचे १८.०० वाजेपर्यंत कार्यालयाच्या establishmentbr-nm@mahapolice.gov.in या ई-मेलवर नोंदवाव्यात. आक्षेप / हरकती नोंदविताना त्यांनी स्वतः चे संपूर्ण नांव, आवदेन अर्ज क्रमांक, चेस्ट क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी तपशिल ई-मेल मध्ये नमुद करावा. मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप / हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांना नोंद घ्यावी. तर या

भरती प्रक्रिये दरम्यान आवश्यक ते बदल/निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे ठेवण्यात येत आहेत.

👉नवी मुंबई पोलीस भरती शारीरिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top