MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती निघाली आहे. (MCGM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MCGM Bharti 2023
एकूण जागा : 652 जागा
पदाचे नाव : परिचारिका / Staff Nurse
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (10+2) उत्तीर्ण झालेला असावा.
- उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (General Nursing & Midwifery) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण केलेला असावा. (3 किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा.)
- उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण अद्ययावत केलेले असावे.
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्चस्तर /निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
- उमेदवार डी. ओ. ई.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी. किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तरावरील प्रमाणपत्रे किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम.एस.सी.आय.टी. किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणे किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराकडे सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने/तिने शासनाने विहित केलेली एम.एस. सी. आय. टी.ची परीक्षा नेमणूकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल..
वयोमर्यादा (Age Limit) :
- अर्ज सादर करावयाच्या दिनांकास म्हणजेच दि. 21.03.2023 रोजी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे पर्यंत व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 ते 43 वर्षे पर्यंत.
- अगोदरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कायम सेवेत असल्यास उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा नाही.
- माजी सैनिक व शारिरीकदृष्टया दिव्यांग असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 45 वर्षे पर्यंत शिथिल करण्यात येईल.
- शासन निर्णयानुसार खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेता उपरोक्त पदांसाठी असलेली विहित वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.
- पदवीधर / पदवीकाधारक अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंत वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)
पगार (Salary) – रु.35400-112400/- .
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 मार्च 2023
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here