eklavya-scholarship

एकलव्य स्कॉलरशिप योजना | Eklavya Scholarship | MahaDBT Scholarship

Eklavya Scholarship: महाराष्ट्र राज्य शासनाकडून होतकरू व गरिब विद्याथ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी एकलव्यर्थक सहाय्य योजना सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आणि कला वाणिज्य आणि कायदा पदवीमध्ये ६० टक्के गुण आणि विज्ञान पदवीमध्ये ५० टक्के गुण मिळा स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.


Eklavya Scholarship | एकलव्य आर्थिक सहाय्य योजना

योजनेच्या अटी व शर्ती:

  1. कला, वाणिज्य, विधी व शिक्षणशास्त्र शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान ६० टक्के व विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान ७० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  2. विद्यार्थीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  3. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे…
  4. संबंधित लाभार्थी विद्यार्थी कुठेही पुर्णवेळ नोकरी करणारा नसावा.
  5. शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी शुल्क माफीच्या सवलतीस पात्र राहील.
  6. अर्धवेळ अभ्यासक्रमाचा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाही.
  7. बी. एड. प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच एम. फील व पी. एच. डी व तत्सम अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू नाही.
  8. सदर शिष्यवृत्ती मंजूर झाल्यास इतर केंद्र / राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  9. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र.
  10. नियमित उपस्थिती ७५ टक्के असणे आवश्यक आहे.
  11. नूतनीकरणासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षी किमान ५० टक्के गुण आवश्यक.
  12. नूतनीकरणासाठी विद्यार्थानि मागील वर्षीच्या अर्ज ओळख क्रमांकाचा उपयोग करावा.




आवश्यक कागदपत्रे | Maharashtra Eklavya Scholarship

  1. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र.
  2. शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षांचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकान्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  3. मागील वर्षांची गुणपत्रिका,
  4. नूतनीकरणासाठी उपस्थिती प्रमाणपत्र.

लाभाचे स्वरूप: सदर शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ५ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते…



अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

image

येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top