MPSC Time Table 2023

MPSC Time Table 2023: MPSC चे 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर!! येथे पहा वेळापत्रक

MPSC Time Table 2023: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 28 सप्टेंबर 2022 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच @mpsc.gov.in वर MPSC वेळापत्रक 2023 प्रसिद्ध केले आहे. राज्यसेवा, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तसेच गट क संयुक्त पूर्व परीक्ष याचसोबत महाराष्ट्र तांत्रिकसेवा पूर्व परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, व न्याय दंडाधिकारी यासह इतर परीक्षा कधी आणि या भरतीची जाहिरात कधी निघणार याबाबत सविस्तर माहिती खलील लेखात देण्यात आलेली आहे.


MPSC Time Table 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. MPSC च्या 2023  या वर्षांत होणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ या साईटवर जाऊन सविस्तर माहिती पाहता येणार आहे.




राज्यसेवा पूर्व परीक्षा 04 जून 2023 या दिवशी तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर या 4 दिवशी होणार आहे. तसंच याचा निकाल अंदाजे जानेवारी 2024 मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 च्या अंतर्गत 10 संवर्गासाठी जानेवारी 2023 मध्ये जाहीरात निघेल तर 30 एप्रिल 2023 रोजी परीक्षा पार पडेल.

MPSC Time Table 2023 पाहण्यासाठी – येथे क्लिक करा 




टीप:

  1. शासनाकडून संबंधित संवर्ग / पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल; यागृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहितवेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.
  2. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना /दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  3. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  4. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.
  5. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top