Maharashtra Police Bharti 2022 Update: महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. आजघडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी ५ जुलै २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे वास्तव’ उघड झाले आहे.
पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन
Maharashtra Police Bharti 2022
पोलीस दलातील कामकाज सुधारावे, या अनुषंगाने कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. कोरोना संकटामुळे या याचिकेवरील सुनावणी दोन वर्षे लांबली. आता २५ जुलै २०२२ रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एम. एस. कर्णिक यांनी त्यावर सुनावणी करताना पोलीस दलातील रिक्त जागांबाबत ९ नोव्हेंबरला शासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या तारखेपर्यंत किती जागा भरल्या व उर्वरित जागा केव्हा भरणार, याची माहिती शपथपत्राद्वारे मागण्यात आली आहे.
या याचिकेच्या अनुषंगाने गृहविभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती उघड केली. राज्य पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकूण ४३ वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यासाठी एकूण दोन लाख १९ हजार ७७६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्यात एक लाख लोकसंख्येमागे १९८ पोलीस उपलब्ध होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १७४ पोलीस उपलब्ध होत आहेत.
वेळेत पदोन्नती दिली जात नसल्यानेही रिक्त पदे वाढत आहेत. कोरोनापूर्वी पोलीस दलात पाच टक्के पदे रिक्त होती. कोरोनानंतर ही टक्केवारी १३ वर पोहोचली आहे.
हे आहेत याचिकेतील मुद्दे? (Police Bharti 2022)
- पोलिसांची संख्या वाढवा
- आठ तास ड्यूटी
- रिक्त पदे भरा,
- वाहने अद्ययावत द्या
- यंत्रणा सक्षम करा
- तपासासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा असावी
- सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करावी
- पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही असावे
- शस्त्रे अद्ययावत असावीत
- पोलिसांकडे इलेक्ट्रिक गन (केवळ शॉक देऊन बेशुद्ध करणारी बुलेट) असावी
- पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध योजना असाव्यात
- आदी मागण्यांकडे या याचिकेतून लक्ष वेधले आहे
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here